Download App

फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करा; शरद पवारांची मतदारांना साद

हुकूमशाहीच्या दिशेने निघालेल्या फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची संधी साधा, अशी साद शरद पवार यांनी घातलीयं.

Image Credit: Letsupp

Sharad Pawar : हुकूमशाहीच्या दिशेने निघालेल्या फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची संधी साधा, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतदारांना घातलीयं. सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

साध्या माणसाचा गुंडगिरीचा खरा चेहरा लोकांसमोर येऊ लागला; मंत्री विखेंचा लंकेंना टोला

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी पेट्रोल, गॅस दर कमी, इंधनाचे दर, युवकांना रोजगार देण्याचे आश्वासने मोदींनी दिले होते. आयएलओच्या रिपोर्टनूसार 100 युवकांपैकी 87 तरुण रोजगाराच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे आश्वासने न पाळणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. अशा फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची संधी मतदानारुपी साधावी, असं शरद पवार म्हणाले आहेत.

प्रत्येक नाशिककरांना गोडसेंचा परिचय; उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी सांगितलं पुढचं प्लॅनिंग

तसेच केंद्र सरकारला प्रश्न विचारल्यास त्यांनी झारंखडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. ही हुकूमशाही वृत्तीच असून पंतप्रधान मोदी घटना बदलणार नसल्याचं सांगताहेत, पण त्यांचेच सहकारी 400 खासदार निवडून आल्यानंतर घटनेत बदल करणार आहोत, त्यासाठी मोदींना ताकद द्या असं सांगत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, संविधान बदलण्याचा हा डाव जनतेने ओळखला पाहिजे, त्यामुळेच अशा हुकूमशाही अन् फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. या सभेला आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आदी उपस्थित होते.

follow us

वेब स्टोरीज