शरद पवार धनंजय मुंडेंवर इतके का भडकले? वाचा, लेट्सअप खबरबातचं खास विश्लेषण

शरद पवार धनंजय मुंडेंवर इतके का भडकले? वाचा, लेट्सअप खबरबातचं खास विश्लेषण

Sharad Pawar Vs Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे कुणावर आरोप करताना, टीका करताना किंवा काही बोलताना शक्यतो आक्रमक होत नाहीत असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. परंतु, काही अपवादात्मक प्रश्नांवर आणि व्यक्तिंवर शरद पवार कमालीच्या आक्रमकपणे आणि टोकदार शब्दांत व्यक्त झालेले आहेत. काल एका माध्यमाला मुलाखत देताना धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न करताच पवार भडकले. पवार इतके आक्रमक का झाले? इतके का भडकले? याबाबत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण केलं आहे.  ते काय म्हणाले पाहूया.

 

पदावरून दूर न करता पाठिशी उभे राहिले

यामध्ये करूणा मुंडे हे एक प्रकरण आहे. करुणा मुंडे यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच, करुणा मुंडे यांच्या बहिणीनेही अनेक आरोप केले. या काळात करुणा मुंडे यांना अटक झाली. त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडलं. मुंडे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली. या सगळ्या प्रकरणात शरद पवारांनी धनंजय मुंडे जबाबदार पदावर असतानाही पदावरून दूर न करता त्यांच्या पाठिशी शरद पवार उभं राहण्याचा निर्णय घेतला. यानंतरही धनंजय मुंडे थेट पवारांवर बोलत असतील तर तो राग पवारांना असू शकतो.

 

पहाटेच्या शपथविधीचे सुत्रधार

2019 चा अजित पवार यांचा भाजपसोबतचा शपथविधी हा एक विषय आहे. अजित पवारांनी आपल्या आमदारांना बोलावलं होत तो बंगला तत्कालीन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा शासकिय बंगला होता. तसंच, अजित पवार भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हे आमदारांना सांगण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं होत. तसंच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतानाही धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची छुपी युची होती असाही पवारांना संशय होता. या सर्व गोष्टींचा पवारांना राग आहे.

 

तरी अजित पवारांसोबत गेले

आपल्याला राजकीय संधी मिळत नाही. डावललं जातय म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्याला राष्ट्रवादीत घ्या म्हणून पवारांमागे तगादा लावला होता. त्यानंतर पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं. आमदार केलं, विरोधी पक्षनेता केलं. हे सगळ होत असताना पवारांना मुंडे यांच घर फोडल हा आरोप आजपर्यंत सहन करावा लागत आहे. मात्र, हे सर्व करूनही मुंडे अजित पवारांबरोबर गेले याचाही पवारांना राग असावा.

 

पवार गोपिनाथ मुंडेंवर कधी बोलले नाहीत

बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला येऊन धनंजय मुंडे शरद पवारांच्या विरोधात बोलले. बारामतीत मुंडे म्हणाले, अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीला कुणी पाठवलं? शिंदे यांच्या बंडावेळी भाजपसोबत चर्चेसाठी अजित पवारांना कुणी पाठवल? असे प्रश्न उपस्थित करून धनंजय मुंडे म्हणाले, याच उत्तर शरद पवार, शरद पवार शरद पवार. या सगळ्या गोष्टींचा राग पवारांना असावा. कारण आयुष्यभर गोपिनाथ मुंडे आणि शरद पवार असा राजकीय संघर्ष राहीला. मात्र, त्यांना पवार असं कधी बोलले नाहीत. परंतु, त्यांच्या पुतण्लाला काही पवारांनी सोडलं नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube