Download App

सतेज पाटलांचा आमदार विनय कोरेंना धोबीपछाड, विजयाचा चौकार

कोल्हापूर : जिल्ह्यात आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि आमदार विनय कोरे यांच्यात राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपासून करवीर तालुक्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या (Kumbi-Kasari Cooperative Sugar Factory) निमित्ताने पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले होते. यामध्ये सतेज पाटील यांनी विनय कोरे यांना धोबीपछाड देत कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवले आहे.

आमदार सतेज पाटील गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत कोरे गटाला दणका दिला आहे. चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

सलग चौथ्यांदा कारखाना ताब्यात ठेवत नरके यांनी राजकारणावरील आपली पकड घट्ट असल्याचे विरोधकांना दाखवून दिले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले.

नरके यांच्या ताब्यातील साखर कारखाना काढून घेण्यासाठी आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली होती. परंतु, सभासदांनी नरके घराण्याकडेच कारखाना सुरक्षित राहू शकेल या भावनेने मतदान केल्याने अटीतटीच्या लढतीतही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली.

शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यासाठी सत्तेवर बसलंय : रोहित पवारांचा घाणाघात

द्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली. गेले पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोप झाल्याने निकालाबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती.

कोल्हापुरात सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर ज्याची पक्कड त्या लोकप्रतिनिधीला आपले वर्चस्व ठेवणे सहज शक्य होते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सहकारी संस्थेवर आपल्या गटाची सत्ता असावी, यासाठी प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर कुंभी साखरची पंचावार्षिक निवडणूक पार पडली. कुंभी साखरच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण काही प्रमाणात विस्कळीत झाले असून एकीकडे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्यासोबत कुंभीसाठी लढा सुरु केला.

तर गोकुळसाठी विरोधात लढलेले आमदार पी. एन. पाटील व बाजीराव खाडे यांनी कुंभीसाठी एकत्र लढण्याची भुमिका घेतली आहे. गोकुळसाठी बाजीराव खाडे गट व आमदार सतेज पाटील यांनी एकत्र लढा दिला आहे, तेच आता कुंभीसाठी वेगळ्या भुमिकेत आहेत. तर यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी हात मिळवणी करत कुंभीसाठी लढा दिला आहे. त्यामुळे आमदार पाटील व माजी आमदार नरके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Tags

follow us