Download App

उद्धव ठाकरेंना अनेक जण सोडून गेले पण शंकरराव गडाख सोबत राहिले ….

अहमदनगर – शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीनंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्विकारला होता. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांनी आपण केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.

शंकरराव गडाख यांनी नेवासा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या गटाला दिल्यामुळे हा मोठा अनाकलनिय आणि दुर्देवी निर्णय आहे. मी केवळ उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहील, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली आहे.

Sambhaji Raje Chhatrapati म्हणाले, खासदारकीचं स्वप्न पूर्ण झालं अन् वडिलांना मिठी मारली

आमदार शंकरराव गडाख पुढं म्हणाले की, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या गटाला देण्याचा निर्णय घेतलेला असला तरी यामुळे मुळ शिवसेनेचे कार्यकर्ते खचून न जाता पेटून उठतील. रक्ताचे पाणी करुन शिवसैनिक गावागांवामध्ये व घराघरांमध्ये जावून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रसार करतील असा विश्वास माजी मंत्री गडाख यांनी व्यक्त केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह काढून घेवून दुसऱ्या गटाला बहाल केले हा अनाकलनिय व दुर्देवी निर्णय असल्याची जळजळीत प्रतिक्रिया आमदार गडाखांनी देत निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका केली आहे. आमदार गडाख यांनी प्रथमच निवडणूक आयोगावर चांगलीच आगपाखड करुन चिन्ह नसले तरी शिवसेना खचून न जाता आता शिवसैनिकच पेटून उठतील असा गर्भित इशारा दिला आहे.

स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार तळागाळापर्यंत पोहविण्याचे काम करतील असा विश्वास व्यक्त करत मी उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे सुचक वक्तव्य यावेळी करुन राज्यातील शिवसेनेच्या आमदारांनाही एक प्रकारचा धीर देवून पक्षालाही संकटात साथ देण्याचे अभिवचन आमदार गडाख यांनी नेवासा येथे माध्यमांशी बोलतांना दिले आहे.

आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून विजयी होताच शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे शिवसेनेने आमदार गडाखांना कॅबिनेट दर्जाचे मंञी पद देवून गडाखांचा सन्मान देखील केला होता. शिवसेनेच्या प्रेमात आमदार गडाख पडलेले असून निस्वार्थी प्रेम करुनही शिवसेनेने मंञीपद बहाल केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे ते आता खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी नेवाशात मनमोकळेपणाने सांगितलेले आहे.

Tags

follow us