Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काल सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी कापसेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी एक राजकीय गुगली टाकली. त्यांच्या या वक्तव्यातून नेमका कुणाला टोला लगावला याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. आपण केंद्रात किंवा राज्यात कुठेच नसलो तरी सगळीकडे आहोत. राज्य आणि केंद्र सरकार संबंधित प्रश्न उपस्थित झाले. यापैकी मी कुठेच नाही पण काळजी नसावी मी कुठेच नसलो तरी सर्व ठिकाणी आहे. जी काही दुखणे असतील त्या सर्वांची नोंद मी घेतली आहे आणि यानंतर प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील जे काही शेतीसंबंधी प्रश्न असतील ते कसे सुटतील यासाठी राज्य आणि केंद्र सरकारबरोबर चर्चा करील. शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहेत त्यांच्यावर जर दबाव आणण्याचे काम कुणी करत असेल तर तो दबाव संपवण्याचा विचार आम्ही करू, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला.
Sharad Pawar : ‘चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल पण, निवडणुकीनंतर’; शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
अमित शहांना खोचक टोला
केंद्रीय गृहमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार को क्या समझता है असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही पवारांनी समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी अमित शहा नावाचे गृहस्थ जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की शरद पवार को क्या समझता है. लोकांनी निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव सांगितलं की त्यांना नीटनेटकं समजतं. राजकारण या ठिकाणी काढायचं नाही, असा टोला शरद पवार यांनी मंत्री शहांना लगावला.
राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. नेमक्या त्याच वेळी राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवारांचा गट सरकारमध्ये आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटप आणि अन्य घडामोडींत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस वरचढ ठरताना दिसत आहे. या तिन्ही पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाचीही चर्चा सुरू होणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय होता, त्यांच्या निशाण्यावर कोण आहेत, याचं उत्तर येत्या काही दिवसांत नक्कीच मिळेल.
सगळा बालिशपणा! शरद पवारांचा कुणबी दाखला अन् OBC दाव्याला सुप्रिया सुळेंनी फटकारलं