Download App

शिक्षकाने पत्नीचा गळा चिरला, मुलाचा उशी ठेऊन जीव घेतला अन् स्वत:ही संपला

Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून पोलिसांकडून या घटनेचा सर्वच बाजूने तपास सुरु आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही.

Uttarakhand Tunnel: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणारे ‘हिरो’

नेमकं काय घडलं?
अतुल सुमंत मुंडे (वय 40), तृप्ती अतुल मुंडे (वय 35) ओम मुंडे (वय 5) असं या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. सोलापुरातील शहरातील नाईकवाडीमध्ये फ्लॅटमध्ये हे शिक्षक कुटुंब राहत होतं. पती अतुल मुंडे करमाळ्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर पत्नी तृप्ती मुंढे बार्शीतल्या अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होत्या.

आज या शिक्षक कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये अचानक अतुल मुंडे यांच्यासह पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासादरम्यान, अतुल मुंडे यांनी आपली पत्नी आणि मुलाची हत्या करुन स्वत; आत्महत्या केल्याचं समोर आलं असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Ahmednagar News : नगरमध्ये मोठ्ठा घोटाळा! काँग्रेस नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार

अतुल मुंडे यांनी राहत्या घरात पत्नी तृप्ती मुंढे यांचा गळा चिरुन हत्या केली तर मुलगा ओम मुंडे याची तोंडावर उशी ठेवून हत्या केल्याचं समोर आलं आहे. तसेच पत्नी आणि मुलाला संपवल्यानंतर स्वत:नेही आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर सोलापुर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अतुल मुंडे-तृप्ती मुंढे दोघेही शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. दोघांचाही संसार सुखाने सुरु असताना अतुल मुंडे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असावं? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतंही कारण समोर आलेलं नाही.

ही घटना नागरिकांना समजताच पोलिसांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत तत्काळ धाव घेतली. एकाच कुटुंबात एकाचवेळी तीन सदस्यांचे मृतदेह आढळून आल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याचा छडा लावणं आव्हानात्मक असणार आहे. पोलिसांनी या घटनेचा सर्वच बाजून तपास सुरु केला असून मुंडे कुटुंबात कोणत्या कारणाने वाद सुरु होते का? याची चौकशी पोलिस करीत आहेत.

Tags

follow us