Download App

सुजय विखेंचे राम शिंदेंना प्रत्युत्तर; रोहित पवारांना पाठिंबा देण्यावर कोण विश्वास…

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe Patil On Ram Shinde: आमदार राम शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून गंभीर आरोप केले आहेत. बाजार समितीत विखे पिता-पुत्रांनी आमदार रोहित पवारांनी मदत केल्याचा आरोप शिंदेंनी केलाय. त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले होते. आता खासदार सुजय विखे यांनीही थेट प्रत्युत्तर दिले आहे. त्यात पवारांशी असलेल्या राजकीय संघर्षावरही विखे बोलले आहेत.

भाजप प्रवेशापूर्वी पुरंदरचे माजी आमदार म्हणाले, ‘…तरी अजितदादांना झुकूनच अभिवादन करणार’

सुजय विखे म्हणाले, बाळासाहेब विखेंपासून पवारांशी आमचा संघर्ष आहे. तो माझ्या लोकसभेपर्यंत राहिला आहे. तो लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे राम शिंदेंच्या रोहित पवारांना पाठिंबा देण्याच्या आरोपावर कोण विश्वास ठेवणार आहे. राम शिंदे यांच्या मनात काही शंका निर्माण झाली असेल तर त्याचे निरसण करण्याची जबाबदारी आमची आहे. याबाबत आम्ही पक्षाध्यक्ष व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बाजू मांडू. याबाबत माध्यमांसमोर चर्चा करणे संयुक्तीक नसल्याचा टोलाही विखे यांनी राम शिंदे यांना लगावला आहे.


जागा वाटपाच्या फॉर्मुल्याबाबत जयंत पाटलांचं मोठं विधान…

मतभेद सगळीकडे असतात. काही गैरसमज झाले आहेत. काही लोकांनी मतभेद निर्माण केले आहेत, असे विखे यांनी म्हटले आहे. राम शिंदे हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे. यावर विखे म्हणाले, मीच खासदार होणे आवश्यक नाही. पण २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे उमेदवार मीच असावे असे नाही. कोणी उमेदवार असू शकतो, असे विखे म्हणाले.

जामखेड बाजार समितीच्या सभापती आमदार राम शिंदे यांच्या गटाचा झाला आहे. तर उसभापती आमदार रोहित पवारांच्या गटाचा झाला आहे. दोन्ही निवड ही ईश्वरचिठ्ठीने झाली आहे. या निवडीनंतर राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना विखे पिता-पुत्रांनी पक्षाविरोधात काम केले आहे. त्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे सांगितले आहे. यातून विखे व शिंदे यांच्यामध्ये वाद असल्याचे समोर आले आहे.

Tags

follow us