Download App

Gulabrao Patil यांच्यामुळे मंत्रीपद मिळालं, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा

  • Written By: Last Updated:

सांगली – सहकारतीर्थ कै. गुलाबराव पाटील यांच्यामुळे मंत्रीपद मिळाल्याचा किस्सा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी सांगलीतील कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर सांगितला. त्यावेळी शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे एकाच मंत्रिमंडळात काम करीत होते. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या अंतुले सरकारमध्ये दोघांनाही संधी मिळाली नव्हती.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील जाऊन बराच काळ झाला पण त्यांच वागणं, कर्तृत्व आजही आमच्यासमोर दिसतं. गुलाबरावांची आणि माझी जास्त ओळख नव्हती. 1980-81 साली बॅ. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मी 1978-80 या काळात शरद पवारांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होतो. अंतुले मुख्यमंत्री झाले आणि गुलाबराव पाटील महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

Kasba By Election : ब्राम्हण समाजाची काय भूमिका? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

1981 च्या दरम्यान गुलाबरावांनी वर्तमानपत्रात एक स्टेटमेंट केलं की सुशीलकुमारसारख्या एका कर्तृत्वान मंत्र्याला तुम्ही घेतलं नाही. त्या काळात महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षाचा शब्द मुख्यमंत्री देखील मोडत नव्हते. त्यांच्या त्या विधानाची राज्यात खुप चर्चा झाली. मी त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर होतो. अंतुले यांचे सरकार इंदिरा गांधींचे सरकार होतं. पण मी इंदिरा गांधींच्या तिकिटावर निवडून आलो होतो. त्यानंतर वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला अर्थमंत्री केलं. गुलाबराव पाटलांच्या त्या विधानामुळे मला वसंदादांनी अर्थमंत्री केलं, अशी आठवण माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितली.

सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा सांगलीत मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी या सांगता कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के.पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, कामागर मंत्री सुरेश खाडे, माजी मंत्री विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

follow us