Download App

“कॉलर उडवतात, मुलींसोबत डान्स करतात, ही शिस्त आहे का?” केंद्रीय मंत्र्यांना सवाल; उदयनराजेंचा पत्रकाराला रागीट लुक

सातारा : भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कॉलर उडवण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल यामुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सार्वजनिक व्यासपीठावरील महिलांसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओमुळे केंद्रीय मंत्र्यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ततपप झालेले पाहायला मिळाले. (Udayanraje Bhosale flings collars, dances with girls’, journalists question Union Minister)

छत्रपती उदनराजे भोसले यांचा दहिहंडी मोहत्सवादरम्यानचा महिलांसोबत सार्वजनिक व्यासपीठार डान्स करतानाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली. छत्रपती घराण्यातील व्यक्तीने अशाप्रकारे डान्स करणे योग्य आहे का? हीच का भाजपची संस्कृती असे अनेक सवाल समाजमाध्यमांवर त्यांना विचारण्यात आले.

जेलमधून छगन भुजबळ जामिनासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप

याचदरम्यान, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा सातारा दौऱ्यावर होते. दौरा आटोपून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांच्या शेजारी छत्रपती उदयनराजेही बसले होते. यावेळी अजय मिश्रा भाजपमधील पक्षशिस्तीबद्दल बोलत होते. हाच मुद्दा पकडून पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांच्या डान्स आणि कॉलर उडवण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा, अजय मिश्रा यांचे ततपप झालेल्या आणि सारवासारव करावी लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी पत्रकार प्रश्न विचारत असताना आणि मंत्री मिश्रा उत्तर देत असताना बाजूलाच बसलेले उदयनराजे भोसले पत्रकाराकडे अत्यंत रागीट नजरेने पाहत होते.

MPSC Chairman : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी दिलीप पांढरपट्टे यांची नेमणूक !

यावेळी पत्रकाराने मंत्री मिश्रा यांना प्रश्न विचारला, तुमचा पक्ष शिस्तीबाबत बोलतो. पण, तुमच्या बाजुला बसलेले खासदार खुलेआम कॉलर उडवतात, सार्वजनिक व्यासपीठावर मुलींसोबत डान्स करतात. ही शिस्त आहे का? हे भाजपाचे चेहरे आहेत, हे चांगलं आहे का? यावर अजय मिश्रा म्हणाले, “पक्षात पूर्ण शिस्त आहे. आपण कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी भाजपाच्या कोणत्या कार्यक्रमात डान्स केलाय का? तुम्ही तुमच्या घरात काय करता, हा आमचा विषय नाही. तुम्ही कोणत्या कार्यक्रमात जाता, हा व्यक्तिगत प्रश्न आहे, पक्षाच्या कार्यक्रमात, संघटनेत आणि निवडणुकीत नेते, कार्यकर्ते पूर्ण शिस्तबद्ध असतात” असे उत्तर त्यांनी दिले.

Tags

follow us