Download App

आदित्य ठाकरेच्या वडिलांना शेतीतलं काय कळतं? संजय गायकवाडांची ठाकरेंवर खरमरीत टीका

  • Written By: Last Updated:

आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांना शेतीतलं काय कळत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, ते स्वतः शेती करतात. अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं होत. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक भागातील काही ठिकाणी जाऊन शेतीची पाहणी केली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. मुख्यमंत्री फोटो काढण्यासाठी बांधावर गेले होते, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्याला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात येत आहे.

Chandrakant Patil : नाराजी नाही, राजीनामा घ्या; राऊतांनी शिंदेंना खडसावले

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे यांना जोरदार उत्तर दिल आहे. आदित्य ठाकरे यांना आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे उध्दव ठाकरे यांना शेतीतलं काय कळत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, ते स्वतः शेती करतात. याच्यामुळे अशा नेभळट पोराला कोणावर टीका करायची याची अक्कल असली पाहिजे. अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की आपले वय किती, आपण काय करतो, आपण शेतीत गेलो का? मुख्यमंत्री शेतीत काम करताना आम्ही पाहतो, कोणाबद्दल आपण बोलतो, हे कळले पाहिजे अशा शेलक्या शब्दांत आदित्य ठाकरेंवर गायकवाड यांनी टिका केली आहे.

Sheetal Mhatre : लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी…

…आणि आम्हाला शहाणपणा शिकवता

यावेळी त्यांनी अयोध्या वारीवरून देखील ठाकरे यांना उत्तर दिले. ते म्हणाले की ज्यांना रामाचं अस्तित्वच मान्य नाही. भारतामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या रथ यात्रा निघाल्या, राम मंदिरासाठी आंदोलन झाली. त्यावेळेस देशात काँग्रेसच सरकार असताना त्या शरयू नदीच्या पात्रामध्ये लाखो साधू संताच्या लाशा पडल्या होत्या. अशा लोकांसोबत तुम्ही आघाडीमध्ये जाता, अशी टीका यावेळी गायकवाड यांनी केली.

ते पुढे म्हणाले की रावणापेक्षा क्रूर काम या सरकारने केलं. अनेक साधू गोळीबारात मारले होते. एवढं पाप करणाऱ्या पक्षासोबत तुम्ही जाता आणि आम्हाला शहाणपणा शिकवता, असा सवाल त्यांनी यावेळी ठाकरे यांना विचारला. काँग्रेस पक्ष हे कधी प्रभू रामचंद्रांना मानत नव्हता, त्याच्यासोबत तुम्ही राहणारे कधीच रामराज्य आणू शकत नाही.

Tags

follow us