उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारांचा प्रोटोकॉल काय? सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात का?

उपमुख्यमंत्र्यांच्या अखेरच्या निरोपाचा अधिकृत प्रोटोकॉल काय असतो आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात का?

Untitled Design (333)

Untitled Design (333)

What is the protocol for the funeral of Deputy Chief Minister Ajit Pawar? : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांचे खासगी चार्टर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला असून आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या अखेरच्या निरोपाचा अधिकृत प्रोटोकॉल काय असतो आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा अधिकृत प्रोटोकॉल काय आहे?

भारतामध्ये घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर अंतिम निरोपासाठी ठरावीक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. गृह मंत्रालयाच्या मानक प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती, पंतप्रधान, माजी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य सन्मान देणे अनिवार्य आहे. उपमुख्यमंत्री हे घटनात्मकदृष्ट्या कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे पद मानले जाते. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना राज्य सन्मान द्यायचा की नाही, हा निर्णय पूर्णतः राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विवेकाधिकारावर अवलंबून असतो.

आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्का; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सन्मान, तिरंगा आणि गार्ड ऑफ ऑनर

राज्य सन्मान मंजूर झाल्यानंतरच पार्थिव राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळले जाते. भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, अधिकृत आदेशाशिवाय तिरंग्याचा वापर करणे कायद्याने निषिद्ध आहे. राज्य सन्मानाचा भाग म्हणून राज्य पोलीस दल किंवा सैन्य दलाकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. काही प्रसंगी औपचारिक तोफांची सलामीही दिली जाते. याशिवाय राज्य शोककाळात सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवले जातात आणि सर्व शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द केले जातात.

महाराष्ट्रातील विशेष परंपरा

महाराष्ट्रात अशी परंपरा आहे की राज्याच्या राजकारणात आणि विकासात मोलाचे योगदान दिलेल्या नेत्यांना, ते अनिवार्य घटनात्मक श्रेणीत येत नसले तरी, राज्य सन्मानाने निरोप दिला जातो. अजित पवार यांच्या बाबतीतही राज्य प्रोटोकॉल विभागाने प्रस्थापित नियमांनुसार सन्मानपूर्वक अंत्यसंस्कारासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे.

अंत्यसंस्काराला सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहू शकतात का?

सहसा राज्य अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते. संपूर्ण आयोजन राज्य प्रशासनाकडून केले जाते आणि ते कुटुंबीयांशी समन्वय साधून पार पडते. या अंतर्गत समर्थक, पक्ष कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना अंतिम दर्शन आणि श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली जाते. मात्र, सुरक्षा कारणांमुळे आणि प्रोटोकॉलनुसार स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्काराच्या मुख्य ठिकाणी प्रवेश मर्यादित असू शकतो.

Exit mobile version