Who will opposition leader of legislative assembly by UBT : सोमवार पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. मात्र अद्यापही विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे. त्यामध्ये ठाकरेचे शिवसेना लवकरच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. साठी आज त् ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांचे बैठक झाली.त्यामध्ये विविध नावांची चर्चा झाली आहे.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 5 महिन्यांत बुडाले 91.13 लाख कोटी, पुढे काय होणार?
राज्याला हिवाळी आदिवेशनात विरोधी पक्ष नेता मिळाला नव्हता मात्र अर्थसंकल्पीय आदिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेता बाबत आपण सकारात्मक असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.तर ठकीनंतर आमदार महेश सावंत म्हणाले की,विरोधी पक्ष नेता नावावरूनआजच्या बैठकीत चर्चा झाली, पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील.आदित्य ठाकरे यांचं नाव अंतिम झालं असं तुम्हीच बोलताय मात्र त्याबाबत चर्चा सुरु आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेतील नावे
विधानसभेत महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेनेकडे संख्या बळ अधिक आहे.त्यामुळं त्यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे.ज्येष्ठ नेत भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.नावांचा विचार केला तर आदित्य ठाकरे,आणि सुनील प्रभू यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. क्ष प्रमुख सध्याचे फोडाफोडीचे राजकारण पाहता विरोधीपक्ष पदावर पल्या युवराजाला संधी देता की, शिलेदाराला विरजमान करतातं हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान शिंदे शिवसेनेते ठाकरे शिवसेनेकडून इन्कमिनींग सुरु आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन, पक्षातील आउटगोईंग रोख लावणे , संघटना अधिक मजबूत करण्या बाबत चर्चा झाली.अधिवेशनात पक्षाकडुन कोणते विषय लावून धरायचे, सरकारला कोणत्या विषयाच्या माध्यमातून घेरायचे, महिला सुरक्षा, कायदा सुव्यस्था यावरून सरकारला घेरण्याबाबत रणनीती अखण्यात अली.मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या सर्व आमदारांच्या एका पत्रावर सह्या घेण्यात आल्या असून आमदारांनी सर्व अधिकार हे उद्धव ठाकरे यांना देण्यात आले समजत आहे. पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेत्याचे नाव ठरवण्याचा अधिकार सर्वानुमते उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत.त्यासोबतच आजचं विरोधी पक्ष पदाच्या दाव्याबाबतच पत्र विधिमंडळ अध्यक्ष यांना दिले जाणार आहे.
मातोश्रीवरील बैठकीसाठी विधानसभेतील आमदार दिलीप सोपल आणि राहुल पाटील वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित असल्याचे समोर आले आहे. आजच्या बैठकीला विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार उपस्थित होते. त्यासोबत महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते