Download App

अजितदादा, भुजबळ अन् आता शिवेंद्रराजे भोसले, मंत्रालयातील 602 नंबरचा दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?

Shivendrasinh Raje Bhosale : आपल्या देशात राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे नाते खूप जुने आहे. अनेकदा मंत्री सरकारी बंगले, ऑफिस घेण्यास इच्छुक

  • Written By: Last Updated:

Shivendrasinh Raje Bhosale : आपल्या देशात राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे नाते खूप जुने आहे. अनेकदा मंत्री सरकारी बंगले, ऑफिस घेण्यास इच्छुक असतात मात्र मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन घेण्यास आता अनेक मंत्री घाबरत आहे. या पाठीमागे कारण म्हणजे या दालनाला असणारा इतिहास होय. या दालनात आलेला मंत्री पुन्हा मंत्री होत नाही, असं 2014 पासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दालनाबाबत अनेक शुभ – अशुभ चर्चा सध्या मंत्रालयात सुरु आहे.

महायुती सरकारमध्ये मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale) यांना देण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 601, 602 आणि 604 अशी तीन दालनं देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल.

इतिहास काय आहे?

1999 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांना 602 क्रमांकाचे दालन देण्यात आले होते 2003 पर्यंत सर्वकाही सुरळीत होते मात्र त्याच वर्षी तेलगी घोटाळ्यात छगन भुजबळ यांचा नाव समोर आला आणि यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील 602 क्रमांकाचे दालन देण्यात आले होते मात्र त्यांचा देखील नाव सिंचन घोटाळ्यात आला आणि त्यांना मंत्रिपद सोडावे लागले.

तर 2014 मध्ये भाजप – शिवसेना सरकारमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना 602 क्रमांकाचे दालन देण्यात आले होते मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांचे नाव जमीन घोटाळ्यात समोर आल्याने त्यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मंत्री पांडुरंग फुंडकर यांना 602 क्रमांकाचे दालन देण्यात आले होते मात्र या दालनात काम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले.

तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांना 602 क्रमांकाचे दालन देण्यात आले होते मात्र त्यांनी या दालनात प्रवेश केला नाही मात्र तरीही त्यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून या दालनात कोणत्याही मंत्र्याने प्रवेश केलेला नाही.

बीड नको, मुख्यमंत्री फडणवीसांना हवं ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रिपद, म्हणाले, दोन्ही उपमुख्यमंत्री …

तर आता राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये 602 क्रमांकाचे दालन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल.

follow us