उदयनराजेंच्या पेंटिंगला विरोध; शिवेंद्रराजे भोसले म्हणतात, ‘साठी बुद्धी नाठी’

उदयनराजेंच्या पेंटिंगला विरोध;  शिवेंद्रराजे भोसले म्हणतात, ‘साठी बुद्धी नाठी’

सातारा : खासदार उदयनराजेंना भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांसाठी काही नवीन नाही. कोणत्याना कोणत्या कारणाने त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. आता या वादात मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उडी घेतली आहे. सातारा (Satara) शहारातील एका इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांची पेंटीग काढली जात होती. ही पेंटिंग काढण्याला शंभुराज देसाई यांनी विरोध केला आहे.

खासदार उदयनराजे यांच पेंटिंग काढण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. पोलिसांच्या विरोधानंतर परिसरात तणाव असल्याचे पाहायला मिळाले. मंत्री शंभुराज देसाई यांच्या घराशेजारील इमारतीवर हे पेंटिंग काढण्यात येत होतं. कार्यकर्ते पेंटिंग काढत असताना पोलिसांना त्यांना विरोध केला आहे. परवानगीशिवाय केलं जाणारे कृत्य सहन केले जाणार नाही, असं शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे. ‘साठी बुध्दी नाठी,’ असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लागवला आहे.

ठाण्यात शिवसेना शाखेचा वाद पेटला, दोन्ही गटाचे कार्यक्रर्ते आमने सामने

शंभुराजे देसाई म्हणाले, ‘कोणतेही विनापरवाना कृत्य सातारा जिल्हा किंवा सातारा शहरात सहन केलं जाणार नाही. वेळप्रसंगी कायद्याचा अंमल केला जाईल’, असा इशारा त्यांनी उदयनराजेंना दिला आहे. त्यामुळे उदयनराजेंना विरुद्ध शंभुराज देसाई असा वाद सातारकरांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

‘कर्नाटक सीमावाद आणि जम्मू काश्मिर यांच्या वादपेक्षा गहन वाद आहे. कारण राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचे पेंटिंग काढायला परवानगी दिली जात नाही. असं समजा याची चर्चा राज्यसभेत होणार आहे. एवढा मोठा विषय झालेला आहे. मराठीत एक म्हण आहे ‘साठी बुद्धी नाठी’. महाराजांचा नुकताच वाढदिवस झालेला आहे. त्यांची साठीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे’, असा मिश्किल टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना लागवला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पेंटिंगचा वाद सुरु आहे. खासदार उदयनराजे यांच्या मालकीची असलेल्या बिल्डिंगवर पेंटिंगवर काढली जात होती. पण त्या भिंती लगत मंत्री शंभुराज देसाई यांचे घर आहे. दोन्ही नेत्यांतील चित्र काढण्याचा संघर्ष किती टोकाला जातो हे पाहावं लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube