ठाण्यात शिवसेना शाखेचा वाद पेटला, दोन्ही गटाचे कार्यक्रर्ते आमने सामने

ठाण्यात शिवसेना शाखेचा वाद पेटला, दोन्ही गटाचे कार्यक्रर्ते आमने सामने

ठाणे : काल सर्वेत्र होळीचा (Holi) सण साजरा केला जात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसैनिकांनी ठाण्यात (Thane) एका शाखेच्या ताब्यावरुन वादाचा रंग उधळला. त्यामुळे ठाण्याच्या शिवाई नगरात धुलिवंदनाच्या दिवशी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवाई नगराचाी शाखा कोणाची यावरुन शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने ठाकले होते.

ठाकरे आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यातील वादामुळे या परिसरातील होळीच्या सणाला तणावाचं गालबोट लागलं. अखेर पोलीसांनी आपला खाक्या दाखवला. यानंतर शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपआपल्या घरी गेले. पण या परिसरातील तणाव धुलिवंदनाच्या दिवशीही कायम असल्याचं दिसून आलं. तिथं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अवकाळी पाऊस अन् शेतमालाच्या हमीभावावरुन अधिवेशन गाजणार

यावेळी शिवसेना नेते नरेश मस्के म्हणाले की, शिवाई नगरची शाखा शिवसेनेची आहे. ठाकरे गटाला इथं बसून काम करायला आमचा विरोध नाही. पण प्रत्येक वेळी त्यांचे लोक कुलूप लावून जायचे. आम्हाला शाखेत यायला कोणाच्या परवानगीची गरज नाही. खरी शिवसेना ही आमची आहे. याठिकाणी आमचे लोक बसून काम करतात. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. धर्मवीर आनंद दीघे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे. या शाखेतून व्यवस्थित काम सुरू होतं. असं शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गटाकडून शिवाई नगर शाखेवर पुन्हा ताबा मिळवल्याचा दावा केला जात होता पण आता शिंदेच्या सेनेने त्या शाखेला टाळे लावले आहे. त्यामुळे भविष्यात शाखेच्या वादावरुन पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं बाकी असलं तरी शिंदे गट आणि ठाकरे गटात राज्यातील पक्ष कार्यालय आणि शाखेचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube