बीड नको, मुख्यमंत्री फडणवीसांना हवं ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रिपद, म्हणाले, दोन्ही उपमुख्यमंत्री …
Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपासून बीडमधील (Beed) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या झाल्याने विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहे.
तर दुसरीकडे भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी देखील राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊ नेय अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घ्यावी अशी मागणी देखील काही नेतेमंडळी करत आहे.
तर आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना आपल्याला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवं आहे याबाबत भाष्य केले आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पालकमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला जर बीडला पाठवलं तर मी जाईल मात्र मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नाही पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन असं माध्यामांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी आतापर्यंत फरार आहे. पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. दुसरीकडे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिकी कराडचे नाव मुख्य आरोपी म्हणून घेण्यात येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे जर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर मला बीडला पाठवलं तर मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेईल असं म्हटल्याने आता बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अल्लू अर्जुन पुन्हा चर्चेत, चेंगराचेंगरी प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला दिले 2 कोटी रुपये
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण अत्याचार घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज दुर्दैवाने समाजामध्ये या घटना घडत आहे. यावर उपाय म्हणजे न्यायव्यवस्ठेने वेगाने न्याय दिले पाहिजे आणि दुसरीकडे समाजात जागृती होणे आवश्यक आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.