अल्लू अर्जुन पुन्हा चर्चेत, चेंगराचेंगरी प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला दिले 2 कोटी रुपये

  • Written By: Published:
अल्लू अर्जुन पुन्हा चर्चेत, चेंगराचेंगरी प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला दिले 2 कोटी रुपये

Allu Arjun : तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुन चेंगराचेंगरी पीडितेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपये दिले आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या (Hyderabad) संध्या थिएटरमध्ये (Sandhya Theatre) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता तर 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. आता अल्लू अर्जुन आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी महिलेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

माहितीनुसार, आज अल्लू अर्जुनचे वडील आणि ज्येष्ठ निर्माता अल्लू अरविंद आणि निर्माता दिल राजू यांनी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलावर उपचार सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयात भेट दिली आणि कुटुंबीयांकडे आर्थिक मदत दिली. डॉक्टरांनी अल्लू अरविंदला सांगितले की मुलाची प्रकृती सुधारत आहे आणि त्याला आता ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज नाही.

मुलाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी अल्लू अर्जुनने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे तर ‘पुष्पा’ चित्रपटाची निर्मिती कंपनी मैत्री मूव्ही मेकर्सने 50 लाख रुपये आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी 50 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

4 डिसेंबरच्या रात्री ‘पुष्पा 2: द रुल’ च्या प्रीमियरच्या वेळी अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटरमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. याच चेंगराचेंगरीत रेवती या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणात महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 डिसेंबरला महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक देखील केली होती.

मोठी बातमी! संसदेजवळ आत्महत्येचा प्रयत्न, एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले

तर दुसरीकडे तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळ (FDC) चे अध्यक्ष आणि मुख्य निर्माते दिल राजू यांनी सांगितले की, सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्यातील चांगले संबंध वाढवण्यासाठी चित्रपट व्यक्तिमत्त्वांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube