जामीन मिळाल्यानंतरही रात्रभर अल्लू अर्जुनचा तुरुंगातच मुक्काम; नेमकं काय घडलं?
Allu Arjun : पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली होती. चित्रपट प्रदर्शनावेळी चेंगराचेंगरी प्रकरणात ही अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनवर ही कारवाई करण्यात आली होती. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसाांकडून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली.
यानंतर शुक्रवारी तेलंगाणा उच्च न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर त्याला जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन लगेचच तुरुंगातून बाहेर येईल असे अपेक्षित होते. परंतु, रात्रभर त्याला तुरुंगातच राहावं लागलं. न्यायालयाच्या आदेशाची प्रत वेळेवर अपलोड झाली नाही. त्यामुळे त्याला रात्रभर तुरुंगातच मुक्काम करावा लागला. यानंतर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अल्लू अर्जुनची चंचलगुडा सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली.
मोठी बातमी : पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक
या प्रकारावर आता अल्लू अर्जुनच्या वकिलांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार म्हणजे बेकायदेशीर डिटेन्शन असल्याचा आरोप केला आहे. वकील अशोक रेड्डी म्हणाले, हायकोर्टाचा आदेश असूनही अर्जुनला तुरुंगातून सोडण्यात आले नाही. तुरुंगातून सुटका करण्यात उशीर झाला. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल. आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहोत.
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली होती. अल्लू अर्जुनही पुष्पा २ च्या स्क्रिनिंगसाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. यावेळी आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटरमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी याठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि यात रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध ५ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता.
पोलीस काय म्हणाले?
या प्रकरणावर बोलताना हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल झोनचे उपपोलीस आयुक्त अक्षांश यादव म्हणाले होते की, “बीएनएस कलम 105 (हत्येच्या प्रमाणात नसलेल्या दोषी हत्यासाठी शिक्षा) आणि 118 (1). )r/w 3 चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनने मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे (5) (स्वैच्छिकपणे दुखापत किंवा गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेची पडताळणी केली जात आहे.
आयुष्मान खुराणाने सुरू केली ‘थामा’ची शूटिंग; दिनेश विजान म्हणाले, ‘थामा साकारण्यासाठी …’