मोठी बातमी : पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक

  • Written By: Published:
मोठी बातमी : पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक

Actor Allu Arjun arrested : पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट प्रदर्शन वेळी चेंगराचेंगरी प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनवर ही कारवाई करण्यात आली आहे.  4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसाांकडून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.

काय प्रकरण आहे?

ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली होती. अल्लू अर्जुनही पुष्पा २ च्या स्क्रिनिंगसाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. यावेळी आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटरमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी याठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि यात रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध ५ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता.

मूठ घट्ट राहिली पाहिजे; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर रोहित पवारांच्या आईचे मोठं विधान

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणावर बोलताना हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल झोनचे उपपोलीस आयुक्त अक्षांश यादव म्हणाले होते की, “बीएनएस कलम 105 (हत्येच्या प्रमाणात नसलेल्या दोषी हत्यासाठी शिक्षा) आणि 118 (1). )r/w 3 चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनने मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे (5) (स्वैच्छिकपणे दुखापत किंवा गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेची पडताळणी केली जात आहे.

‘साबर बोंडा’ ठरला सनडान्‍स फिल्म फेस्टिव्हलमध्‍ये सामील होणारा एकमेव भारतीय चित्रपट!

अल्लू अर्जुनकडून पीडितेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची घोषणा 

घडलेल्या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या एक्ल हँडलवरून एक व्हिडिओ जारी करून महिलेच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले होते. तसेच, अभिनेत्याने मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. तसेच दाखल झालेल्या मुलांचे वैद्यकीय बिलही भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. याशिवाय मुलांच्या भविष्यातील प्रत्येक गरजा पूर्ण करण्याबाबत त्यांनी सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube