अधिवेशन सात दिवसचं? नाना पटोलेंनी पहिल्याच दिवशी जोर लावला, पण फडणवीसांनीही आरसा दाखवला…

नागपुरात आज विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधी वाढवण्याची मागणी केलीयं.

Devendra Fadanvis & Nana Patole

Devendra Fadanvis & Nana Patole

Nana Patole Speak At Winter Session : यंदाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून नागपुरात सुरु झालंय. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी विदर्भाच्या प्रश्नासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी सभागृहात केली. पटोलेंच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोरोना काळातील अधिवेशनाच्या कालावधीची आठवण करुन देत प्रत्युत्तर दिलंय.

मोठी बातमी : सप्तश्रृंगी गडावरील दरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

नाना पटोले सभागृहात बोलताना म्हणाले, मी विधानसभेचा अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या कालावधीबाबत अधिक काळ अधिवेशन चाललं पाहिजे, या मताचा मी होतो. त्यामुळे मी आज सभागृहाच्या अध्यक्षांकडे विनंती करतो की, त्यांनी अधिवेशनाची वेळ वाढवून द्यावी. सभागृहाचा अध्यक्ष असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका असते. विदर्भाच्या प्रश्नांसाठी विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने आपण वेळ वाढवण्याची भूमिका मांडून न्याय द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी सभागृहात केलीयं.

उत्पन्नात होणार वाढ, व्यवसाय वाढणार; जाणून घ्या या राशींसाठी 7 डिसेंबर कसा असेल?

अधिवेशनाचा कालावधी वाढवून द्यावा हा नाना पटोले यांचा आग्रह आहे, मात्र, कोरोना काळात तत्कालीन सरकारचे तीन आणि पाच दिवसच अधिवेशन झालेले आहेत. कोरोना इतर राज्यांतही होता, पण तिथे 15 दिवस अधिवेशन चालत होते, पण महाराष्ट्रात फक्त तीन ते चार दिवस हे अधिवेशन चाललं असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना दिलंय.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपवर आरोप

दरम्यान, नाना पटोले यांनी सभागृहात अधिवेशन वाढवण्याची मागणी लावून धरल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आपली भूमिका मांडलीयं. विदर्भाच्या प्रश्नावर जर गरज पडली तर हिवाळी अधिवेशनाचा वेळ वाढवू, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय. हिवाळी अधिवेशन पुढील सात दिवस चालणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातील प्रश्नांबाबत जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्यानंतर शासकीय कामकाज, शोकप्रस्ताव आणि दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले जाणार आहे.

Exit mobile version