Download App

Rain Update : राज्यात आठवड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना इशारा

  • Written By: Last Updated:

Weather Update : ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच उघाड दिली असली तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. आज पुणे आणि मुंबईसह आणखी पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून आठवडाभरात राज्यात मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून बहुतांश जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर बळीराजा देखील पावसाच्या आगमनाने सुखावला आहे. गणेशोत्सव आता अवघ्या एका दिवसांवर आला आहे. त्यातच राज्यात आता पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.

आज राज्यातील पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

चिखलदऱ्याजवळ भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, ४ पर्यटक ठार, ४ जण जखमी 

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्यानं राज्यात विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. आज, सोमवारी (दि. 18) कोकणात आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुण्यात हलका पाऊस

रविवारी (दि. 17) सकाळपासून अनेक ठिकाणी जिल्ह्यात आणि शहरात हलका पाऊस झाला, तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी शहरात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र सकाळपासून रिमझिम पावसामुळे अनेकांची निराशा झाली. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याचेही दिसून आले. सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण राहून सकाळी किंवा संध्याकाळी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Tags

follow us