चिखलदऱ्याजवळ भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, ४ पर्यटक ठार, ४ जण जखमी

  • Written By: Published:
चिखलदऱ्याजवळ भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, ४ पर्यटक ठार, ४ जण जखमी

Chikhaldara accident : चिखलदरा येथे पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही अर्टिगा कार 200 फूट खाली पडली आणि त्यात चार पर्यंटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदार मार्गावर झाला.

दाट धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दरीत कोसळली होती. रविवारी सकाळी ६ वाजता चिखलदरा-परतवाडा मार्गावरील मडकीजवळ हा अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. मृत व जखमी हे आदिलाबाद (तेलंगणा) येथील रहिवासी असून ते चिखलदरा येथे पर्यटनासाठी जात असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलाबाद शहर व जिल्ह्यातील आठ जण कारने चिखलदरा येथे पर्यटनासाठी निघाले होते. हे सर्वजण मारुती अर्टिगा कार क्रमांक AP-28, DW 2119 ने पर्यटनासाठी चिखलदरा येथे जात होते. मात्र, काल सकाळी परतवाडा मार्गावर धुके होते. त्यामुळे चालक शेख सलमान शेख चांद यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली. चिखलदऱ्याला पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

राज्यात पावसाची स्थिती बिकट, पाणीटंचाईचा प्रश्न उद्गभवणार? पापाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर… 

यात अपघातात चालक शेख सलमान शेख चांद (28), शिव कृष्णा सुधर्मा आडंकी (31), जी. वैभव लक्ष्मणा गुल्ली (29) आणि वाना पार्थी कोटेश्वर राव (27) यांचा मृत्यू झाला, तर जी. श्यामसुंदर लिंगा रेड्डी (30), के. सुमन काठिका (29), के. योगेश यादव (30) आणि हरीश मुथिनेनी (27) हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचल होते. यातील के सुमन काठिका आणि के. योगेश यादव यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावतीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व तरुण तेलंगणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी आहेत.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube