राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच (Election) वार सुरू असतानाच बीड जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेची निवडणूक लढवलेले बीडमधील अजित पवार यांच्या पक्षाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या.
काल रात्री योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज लगेच छत्रपती संभाजी नगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या. डॉ. क्षीरसागर यांच्या प्रवेशाने येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत चित्र बदलणार आहे. त्यांच्या प्रवेशाने बीडमध्ये आता भाजपला मोठी ताकद मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर
वर्षभरापूर्वी झालेली बीडची विधानसभा निवडणूक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या पक्षाकडून लढवताना लक्षवेधी मते मिळवली होती. मात्र, गेल्या काही दिवसापासून त्यांना निर्णय प्रक्रियेतून डावलले जात होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात योगेश क्षीरसागर यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला बीडमध्ये चांगला चेहरा आणि बळ मिळण्याची शक्यता मानली जात आहे. पक्षाचे काही व डॉ. क्षीरसागरांचे अशी गोळाबेरीज करुन पक्ष सर्व जागा लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात बीड नागरपालिका निवडणुकीत रंगत येणार आहे.
