Devendra Fadnavis : वेव्हज जगातील अतिशय मोठा प्लॅटफाॅर्म सुरु झाला असून त्याचे यजमानपद महाराष्ट्राला देण्यात आले आहे. आज महाराष्ट्राने वेव्हजच्या (Waves) दृष्टीने काही एमओयू (MoU) सुरु केले आहे. 43 कंपन्यांचा हा इंडेक्स आहे, गुंतवणूक करण्यासाठी हे मोठं पाऊल आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आज दोन विद्यापीठांसोबत करार करण्यात आला आहे. राज्यात जगातील 100 विद्यापीठ जे येतात ते आपण आणणार आहोत.
याॅर्क विद्यापीठ (York University) आणि ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (Australian University) राज्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. याॅर्क विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलिया विद्यापीठ राज्यात 1500-1500 कोटी रुपयांची गुंतवणुक करणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. याच बरोबर आणखी 4 विद्यापीठसोबत चर्चा सुरु आहे.
आम्ही प्राईम फोकस सोबत एक एमओयू केला आहे. ते एक फिल्मसिटी ते तयार करत आहेत. त्यांची राज्यात जवळपास 3 हजार कोटी गुंतवणूक होणार आहे. यामुळे 2 हजार 500 जणांना रोजगार मिळणार असेही फडणवीस म्हणाले. एमओयूच्या मदतीने जगातील सर्वात महागडे तंत्रज्ञान आणि कोणताही चित्रपट आपल्याकडे तयार करता येणार आहे. मला असं वाटतं की वेव्हज ह्या प्लॅटफॉर्म तयार झाला त्यातून ही गुंतवणूक आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हेरिटेज ट्रेन सुरू होणार; भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज!
फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान आहे, शुटिंग प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन देखील असेल. विद्यापीठांचे ऑफ शोअर कॅम्पस तयार होतील. जे लोकं जाऊ शकत नाही त्यांना त्याच दर्जाचे शिक्षण आता आपल्याकडे मिळेल. रोजगाराची संधी सर्वाधिक आपल्याला मिळणार आहे. कन्टेटचं कन्झम्शन देखील सर्वाधिक आपल्याकडे आहे. असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.