मोठी बातमी! छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, कारण काय?

मोठी बातमी! छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, कारण काय?

Chhagan Bhujbal :  राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातील ओबीसी, भटके-विमुक्त आनंदित असून आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत. आम्हाला ताबोडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं शक्य नाही. त्यामुळे मी स्वत: जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की, मोदींना सुद्धा कळवा. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी दिली.

तसेच छगन भुजबळ यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सन 1992 सालापासून जातनिहाय जनगणना करण्याची होती आणि या मागणीला सरकारने मान्य केल्याने त्यांनी यावेळी  केंद्र सरकारचे आभारही मानले.

बदनाम करण्यासाठी विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न…कर्ज घोटाळा प्रकरणावरून विखेंचा विरोधकांवर पलटवार 

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube