Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी आहेत. त्यामध्ये आता या बसमधून सुदैवाने स्वतःचा बचाव केलेल्या तरूणाने या अपघाताची थरारक घटना सांगितली आहे. ( Young man told thriller experience of Buldhana Bus Accident who save in this Accident )
‘त्यांच्या नुसत्याच वायफळ चर्चा, गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
अपघातातून वाचलेल्या तरूणाने सांगितली थरारक घटना :
आता या अपघाताबाबत अनेक गोष्टी समोर येत असून, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार अपघातानंतर बसला आग लागली. तर या बसमधून सुदैवाने स्वतःचा बचाव केलेल्या तरूणाने या अपघाताची थरारक घटना सांगितली आहे. तो म्हणाला की, माझं नाव योगेश रामदास गवई आहे. मी विदर्भ ट्रॅव्हल्समधून नागपूरवरून छत्रपतीसंभाजीनगरला जाण्यासाठी प्रवास करत होतो. तर समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ आमच्या बसला अपघात झाला. गाडी पलटी झाली आणि गाडीला आग लागली. तेव्हा आम्ही तीन-चार जण काच तोडून बाहेर पडलो. मी एका मुलाला देखील बाहेर काढलं. जसं आम्ही गाडीतून बाहेर उडी मारताच गाडीचा स्फोट झाला. आम्ही दूर पळालो. त्यानंतर फायर ब्रिगेडचे लोक आले त्यांनी आग विझवायला सुरूवात केली. अपघातातून वाचलेल्या तरूणाने हा थरारक घटनाक्रम सांगितला आहे.
#WATCH | I boarded the Vidarbha Travels bus from Nagpur for Aurangabad. The bus overturned and caught fire immediately after it met with an accident on Samruddhi Mahamarg expressway. 3-4 people broke the window and escaped, soon after there was a blast in the bus: Yogesh Ramdas… pic.twitter.com/sh1lg8lmMg
— ANI (@ANI) July 1, 2023
मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर
दरम्यान, या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण या अपघाताबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. याशिवाय अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Agricultural Day 2023 : बळीराजाच्या सन्मानाचा ‘महाराष्ट्र कृषी दिन’ का साजरा केला जातो? जाणून घ्या…
चालकाने सांगितले कसा झाला अपघात ?
बुलढाण्याचे एसपी सुनील कडासेन यांनी सांगितले की, अपघातात २६ प्रवासी जिवंत जाळले, तर चालक-कंडक्टरसह सात प्रवासी जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन मुले असून उर्वरित प्रौढ आहेत. हा अपघात कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, आधी बसचा टायर फुटला, नंतर बस उलटली आणि नंतर गाडीच्या डिझेल टँकरने पेट घेतला, असे चालकाचे म्हणणे आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.