‘त्यांच्या नुसत्याच वायफळ चर्चा, गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

‘त्यांच्या नुसत्याच वायफळ चर्चा, गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

Sanjay Raut : राज्यात सध्या जातीय तणाव, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. या प्रकारांवरून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेरले आहे.

राऊत म्हणाले, या राज्यातील महिला आजिबात सुरक्षित नाहीत. हजारच्या आसपास मुली पुण्यातून ठाण्यातून खानदेशातून मुंबईतून गायब होतात, हे लक्षण कसलं आहे. राज्याचे गृहमंत्री इतर सर्व विषयांवर वायफळ चर्चा करतात. आव्हानाची भाषा करतात. शड्डू ठोकतात. पण गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार हा अत्यंत अयशस्वी आहे. जातीय दंगली धार्मिक तणाव लूटमार दरोडे या प्रकारांना ऊत आला आहे.

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

मोर्चा होणारच

आज शिवसेनेचा मोर्चा असून तो पूर्ण ताकदीने होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे करतील. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. जेव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आली आहे. लोकप्रतिनधी, नगरसेवकांना येऊ दिले जात नाही. या मोर्चात अडथळे आणण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जात आहेत. दुर्दैवाने समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. त्या शापित रस्त्यावर 25 जणांचा मृत्यू होरपळून झालेला आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात संवेदना आहेत. पण जनतेच्या प्रश्नांवरती हा मोर्चा निघणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रस्ते घोटाळा असतील, स्टेट फर्निचर घोटाळा असतील, अनेक विषय आहेत त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला.ज्यांच्या वर खरोखर भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी होती असे सगळे भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे त्यांच्या पक्षात घेतले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

Buldhana Bus Accident : अनेकांचे अश्रू अन् शापामुळे समृद्धीवर अपघात; संजय राऊतांचे धक्कादायक विधान

निवडणुका घ्या मग कळेल चोर कोण ?

भारतीय जनता पार्टी नौटंकी आहे. विशेषतः मुंबईतील भारतीय जनता पार्टी यांना कोणती दिशा नाही. हिंमत असेल तर निवडणुका घ्या ना, म्हणजे शोर कोण वाजवते आणि चोर कोण हे जनता दाखवील. निवडणुका घ्यायच्या नाही, लोकांच्या सामोर जायचं नाही आणि अशा नौटंकी करायच्या म्हणून आमचा मोर्चा पाहून जे आमचे राजकीय विरोधक आहे, सत्ताधारी त्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील. निवडणुका घेण्याची तेच हिंमत करू शकतात ज्यांना विजयाची खात्री आहे आणि आव्हान ते देऊ शकतात आमच्या सारखे निवडणुका घ्या, घेऊन दाखवा आम्हाला माहिती आहे जनता आमच्या पाठीशी आहे, असे राऊत म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube