Agricultural Day 2023 : बळीराजाच्या सन्मानाचा ‘महाराष्ट्र कृषी दिन’ का साजरा केला जातो? जाणून घ्या…

Agricultural Day 2023 :  बळीराजाच्या सन्मानाचा ‘महाराष्ट्र कृषी दिन’ का साजरा केला जातो? जाणून घ्या…

Mharashtra Krushi Din : शेतकरी, बळीराजा सगळ्या जगाचा खऱ्या अर्थाने पोशिंदा. त्याच्या सन्मानाचा आजचा दिवस म्हणजे ‘महाराष्ट्र कृषी दिन’. शेती ही आपली आई आहे असं आपण फक्त म्हणतो. पण तिची खरी जपणूक आणि सेवा शेतकरी करतो. मात्र आज त्याच सगळ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा केवळं मांडली जाते. त्याला न्याय मात्र मिळतच नाही. मात्र आजच्या या ‘महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आपण शेतकऱ्याच्या या सन्मानाच्या दिनाचा सुरूवात कशी झाली. त्याचा इतिहात काय? हे जाणून घेऊया… ( What reasone behind celebrating Mharashtra Agricultural Day )

Parineeti Chopra at Amrutsar: लग्नाआधीच क्यूट कपल पोहोचलं सुवर्ण मंदिरात! ‘या’ तारखेला वाजणार सनई चौघडे

1 जुलै हा दिवस ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1 जुलै याच दिवशी साजरा करण्याचं कारण म्हणजे या दिवशी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा केला जातो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. त्यात महाराष्ट्र हे देशातील शेती क्षेत्रामध्ये आघाडी आहे.

Buldhana Bus Accident : पुणे जिल्ह्यातील कुटुंबावर काळाचा घाला; आई, वडील अन् 20 वर्षीय मुलीचा मृत्यू

कृषी दिनाचा नेमका इतिहास काय?

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 ला झाला. तर ते 1963 ते 1975 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. त्यांनी राज्यातील कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. शेतकऱ्यांच्या विकासाला चालना दिली. म्हणून वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक मानलं जात. त्यामुळे स्मृतीदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा केला जातो.

महाराष्ट्र कृषी दिनाचं महत्त्व काय?

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. त्यात महाराष्ट्र हे देशातील शेती क्षेत्रामध्ये आघाडी आहे. तसेच दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची संधी असते. तसेच शेतीशी निगडीत समस्या आणि त्या मांडण्यासाठी या दिनामुळे शेतकऱ्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम केलं जातं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube