Parineeti Chopra at Amrutsar: लग्नाआधीच क्यूट कपल पोहोचलं सुवर्ण मंदिरात! ‘या’ तारखेला वाजणार सनई चौघडे

Parineeti Chopra at Amrutsar: लग्नाआधीच क्यूट कपल पोहोचलं सुवर्ण मंदिरात! ‘या’ तारखेला वाजणार सनई चौघडे

Parineeti Raghav Chadha Visits Golden Temple: आम आदमीचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत, पंजाबमधील शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिराला त्यांनी भेट दिली आहे. लवकरच लग्न होणार्‍या या जोडप्याने श्री हरमिंदर साहिब येथील मंदिराचे दर्शन घेतले. आता दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नाआधी सुवर्ण मंदिरात पोहोचले आणि त्यांनी दर्शन घेतले आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सुवर्ण मंदिरातून समोर आले आहेत. यामध्ये परिणीती बेज सूटमध्ये तर राघव चढ्ढा हा पांढरा कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेटमध्ये दिसून आला आहे, त्यांचे दोघांचे हे फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

एकीकडे राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा चाहत्यानापासून आपले नाते लपवत होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. तर त्यांचा हा शाही सोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकारणी मंडळीदेखील हजेरी लावणार आहेत. तर त्यांच्या साखरपुड्याचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल झाले होते. आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परिणीती लवकरच जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार जसवंत सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात झाले नाही. परंतु ती इम्तियाज अली दिग्दर्शित अमर सिंह चमकीला या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा पंजाबी गायकाचा बायोपिक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube