Yugendra Pawar On PDCC Bank Open Till 11 PM Voter list found in bank : बारामतीत सध्या पीडीसीसी (PDCC Bank) बँकेवरून वातावरण तापलंय. बॅंक रात्रीचे अकरा वाजले तरी देखील उघडी होती, असा आरोप देखील करण्यात आलाय. यावर आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांची (Yugendra Pawar) प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर
बँकेची वेळ पाच वाजेपर्यंत असते. रात्री उशिरापर्यंत ही बँक उघडी होती. त्या बॅकेत ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या होत्या. त्या का होत्या? सहकारी संस्था शिक्षण संस्थेच्या देखील याद्या (Baramati Politics) बॅकेमध्ये होत्या. बँकेचा लोड वाढला असावा, त्यामुळे रात्री अकरापर्यंत बॅंक उघडी असावी अशी तिखट प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिलीय.
सतराशे रुपये घेऊन अमेरिकेला; ‘हा’ भारतीय जगातील सर्वाधिक पॅकेज घेणारा सीईओ
सध्या पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय. त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झालंय. हे राजकारण बदललं पाहिजे, असं मत युगेंद्र पवारांनी म्हटलंय. जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती, त्यावेळेसच कारखान्याचा विकास का केला नाही, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
रात्री उशिरापर्यंत बॅंक का सुरू होती?
माझ्यापर्यंत काल रात्री काही व्हिडिओ आले आहेत. त्यामध्ये त्यांचे काही कार्यकर्ते दिसले. त्यांना टेबलवर मतदारांची यादी देखील सापडली. बॅंकेची वेळ पाचपर्यंत असते, असं आम्ही ऐकतत आलोय. फक्त माळेगाव कारखान्याच्या नाही, तर सहकारी संस्था शिक्षण संस्थेच्या देखील याद्या बॅंकेमध्ये होत्या. कोणाला नेमकी काय जबाबदारी दिली आहे, हे देखील त्या याद्यांवर नमूद करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत बॅंक का सुरू होती, असा संतप्त सवाल युगेंद्र पवार यांनी केलाय.
मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’
नेमकं काय प्रकरण?
बारामतीतील राजकीय वातावरण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तापलं आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजता देखील उघडी होती, असा आरोप करण्यात येत आहे. याच बँकेमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या सापडल्या, असा दावा सहकार बचाव पॅनलने केला आहे. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जातोय.