मोठा निर्णय! वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 18 हजार

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 18 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित […]

आषाढीवारीत सहभागी दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 18 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील 10 धडाकेबाज निर्णय

– शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा 18 हजार रुपये.

– अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त 7 हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे

– ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार

– राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.

– उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा

– सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास

भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम

– राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

– औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. 50 टक्के मुद्रांक शुल्क सवलत

– भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाहीच; बावनकुळेंनी सांगून टाकलं

Exit mobile version