26/11 Mumbai Attack : 2008 मध्ये मुंबईवर (26/11 Mumbai Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्या हल्ल्याच्या भळभळत्या जखमा आजही देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जिवंत आहेत. 26/11 भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक. दहशतवाद्यांनी आतापर्यंतचा सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून चार दिवस गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यात 164 जणांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते.
26/11 च्या मुंबई हल्ल्याचा घटनाक्रम
– 26/11 च्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते आणि त्यांना उच्च प्रशिक्षित करण्यात आले होते. हे सर्वजण भारतात प्रवेश करण्यासाठी सागरी मार्गाने आले होते. दहशत पसरवणे आणि कंदाहार अपहरण प्रकरणातून काही प्रमुख दहशतवाद्यांची सुटका करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.
– मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना अनेक महिने आधीच तयार करण्यात आली होती. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी भारत-बांग्लादेश सीमेवरून खरेदी केलेले तीन सिमकार्ड वापरले होते. यापैकी एक सिमकार्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात खरेदी केल्याचा रिपोर्ट होता.
Video : ‘हे प्रदर्शन करु नका…’; शहीद जवानाच्या आईसमोर मंत्र्यांचा लाजिरवाणा पब्लिसीटी स्टंट
– त्यानंतर 21 नोव्हेंबर 2008 रोजी नियोजनबद्ध पद्धतीने दहा दहशतवादी पाकिस्तानातून गुजरातमार्गे बोटीतून भारतात आले होते. जाताना त्यांनी चार मच्छिमारांना ठार मारले आणि बोटीच्या कप्तानला भारतात प्रवेश करण्यासाठी धमकी दिली.
– 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी बोटीच्या कॅप्टनची हत्या केली आणि स्पीडबोटीतून कुलाब्याच्या दिशेने निघाले. मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी दहशतवादी एलएसजी, कोकेन आणि स्टेरॉईड्सचे सेवन केले होते.
– यानंतर दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश करताच ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला. ताज हॉटेलमध्ये सुमारे सहा स्फोट झाले, यात अनेक लोक ठार झाले. दहशतवाद्यांनी लोकांना 4 दिवस ओलीसही ठेवले होते आणि अंदाधुंद गोळीबारात अनेकांना ठार केले होते.
PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन
– मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 64 जणांचा मृत्यू झाला होता, तर 600 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात सर्व दहशतवादी मारले गेले मात्र मोहम्मद अजमल आमिर कसाब (Ajmal Kasab) जिवंत पकडला गेला. त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
– जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्यावर शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटक कायदा, सीमाशुल्क कायदा, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
– या हल्ल्यात निवृत्त सैनिक तुकाराम ओंबळे (Tukaram Omble) आणि मुंबई पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक यांनी एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ओंबळे यांना कर्तव्यावर असताना असामान्य शौर्य आणि पराक्रमासाठी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
– जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. ज्याचे पाकिस्तान आजपर्यंत संरक्षण करत आला आहे.
– या हल्ल्यात दहशतवाद्यांना ठार करण्यात सागरी कमांडोंनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ताजमधील बचाव मोहिमेदरम्यान पायाला गोळी लागल्याने कमांडो सुनील यादव यांना वाचवताना एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले होते.