Download App

किरीट सोमय्यांच्या कार्यालयात बंदुकधारी इसम; पोलिसांत तक्रार दाखल…

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात बंदुकधारी इसम शिरल्याची घटना घडली, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीयं.

Kirit Somayya : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya ) यांच्या कार्यालयात अज्ञात बंदुकधारी इसम शिरल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीयं. या प्रकरणी मुलुंडचा नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीयं. या पिस्तुलधारी व्यक्तीला सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत रोखल्याने हे प्रकरण समोर आलं.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास, भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील मुलुंडच्या कार्यालयात शनिवारी अज्ञात बंदुकधारी नागरिक शिरला. यावेळी त्याची झाडाझडती घेतल्यानंतर बंदुक असल्याचं समोर आलं.

पुण्यात काँग्रेसला धक्का! संग्राम थोपटेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

सोमय्या यांच्या कार्यालयात दर शनिवारी जनता दरबार भरत असतो. यावेळी नवघर पोलिस ठाण्याचा स्टाफ असतो. काल दुपारच्या दरम्यान, भिंवडी येथून फारुख चौधरी नावाची व्यक्ती आली होती. या व्यक्तीकडे त्याच्या बंदुकीचं शस्त्र होतं. त्याने याबाबत पोलिस अधिकाऱ्यास सांगितलं. त्यानंतर पोलिस स्टाफने किरीट सोमय्या यांच्या केंद्रीय सुरक्षा रक्षकाला याबाबत माहिती दिली.

अखेर भिसे मृत्यू प्रकरणी घैसास यांच्यावर गुन्हा दाखल; ससूनच्या दुसऱ्या अहवालानंतर मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या

या इसमाच्या झाडाझडतीनंतर बंदुक असल्याचं समोर आलं. त्यानंतर बंदूक बाहेर ठेऊन किरीट सोमय्या यांची भेट घेतल्याचं समजतंय. दरम्यान, सोमय्या यांच्या स्वीय सहाय्यकाने नवघर पोलिस ठाण्यात याबाबत पत्र दिलं असून या व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

follow us

संबंधित बातम्या