श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास, भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास, भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Grape Garland : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली (Ganapati Bappa) होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली (Pune News) आहे.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिरात बाप्पाला निळ्या आणि काळ्या द्राक्षाचा नैवद्य वाढवून त्यातून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या द्राक्षांचे पुण्यातील ‘सुर्योदय फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला वाटप करण्यात आले.

सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘या’ चार मराठी चित्रपटांची कान्स महोत्सवाच्या चित्रपट बाजारासाठी निवड

गणपती बाप्पाचा इतिहास

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्यांना यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागते.

Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली

संहार करणारी मूर्ती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती चार हातांचा आहे. गणपती बाप्पाने राक्षसाचा एक हात सोंडेत धरलेला दिसत आहे. गणपतीने आपला मोडलेला दात आयुध म्हणून हातात धरलेला आहे. तर एका हाताने राक्षसाचे केसदेखील पकडल्याचं दिसत आहे, एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे ही गणेशाची मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून दिसून येते. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्थीला थेट बैलगाडीमधून या गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात येते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube