Download App

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: मुंबई गुन्हे शाखा करणार खूनाचा उलगडा

Abhishek Ghosalkar : मुंबईच्या दहिसर भागात काल गोळीबाराची थरारक घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने देखील (Mumbai News) आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मागील दहा दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेत आता महत्वाची माहिती हाती आली आहे. या खूनाच्या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. मुंबईचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी ही माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतं आहे.

मुंबई हादरली! फेसबुक लाईव्ह करत माजी नगरसेवक घोसाळकराचा गोळ्या झाडून खून

दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. मॉरिसने एकूण 5 राऊंड फायर केले या 5 राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागली तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर इकडे मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता, त्याच व्यवहारातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. याबाबत सविस्तर पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा खून पूर्वनियोजित होता असेही आता सांगण्यात येत आहे. कारण, आरोपीने घोसाळकर यांना फोन करून ऑफिसला बोलावून घेतले होते. त्यानंतर फेसबूक लाईव्ह करत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्यात गुंडांचं सरकार बसलंय; घोसाळकर गोळीबारानंतर ठाकरेंची टीका

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. 2009 ते 2014 या काळात विनोद घोसाळकर आमदार होते. दहिसर मतदारसंघातून ते निवडून आले होते. अभिषेक घोसाळकर माजी नगरसेवक होते.

follow us