Download App

‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर…’; अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून ठाकरेंचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray: विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप (Anganwadi workers strike) पुकारला आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या मोर्चाला संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर सडकून टीका केली. गद्दारी करून आमचं सरकार पाडलं, या खोके सरकारकडे सरकारं पाडायला पैस आहेत, जाहिरातींसाठी पैसे आहेत, पण अंगणावाडी सेविकांना मानधन द्यायला पैसे नाहीत, अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली.

नेहा पेंडसेच्या साडी मधल्या अनोख्या अदा 

अंगणवाडी सेविकांच्या आझाद मैदानावरील मोर्चाला आज उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी संबोधित करतांना ते म्हणाले, मी भाऊ म्हणून आंदोलनता सहभागी होत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, अशी बिरूदं लावू शकू, अशी माणसं उरली नाहीत. तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आहात. असंख्य ज्योती एकत्र येतात, तेव्हा त्याची मशाल तयार होते. ही मशाला सत्ता खाली खेचण्यासाठी असते, असं ठाकरे म्हणाले.

विद्यापीठात अक्षता कलश पूजन करणं कुलसचिवांना भोवलं, पाटील यांची तडकाफडकी बदली

यावेळी त्यांनी आंदोलकांना टाळ्या वाजवण्यचा आग्रह केला. त्यानंतर त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी वाजवून घेतल्या नाहीत. तर तुमच्याजवळ जी ताकद आहे, जे हात जनतेची सेवा करतात, हे सेवा करणारे हात एकमेकांवर आपटले तर आवाज एवढा येतो. सरकारच्या कानाखाली आपटले तर आवाज केवढा मोठा होईल, अशी टीका त्यांनी केली.

खेकडे खाऊन आरोग्य मंत्री सृदृढ
सरकारकडे जाहिरातीसाठी पैसा आहे. मात्र राज्यात तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा सेविकांना त्यांच्या कष्टाचे मोल द्यायला पैसे नाहीत, आजही राज्यात अनेक बालके कुपोषित आहेत. तर दुसरीकडे गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातींमध्ये पाहतोय. गुटगुटीत मंत्री म्हणजे सदृढ भारत नाही. सुदृढ महाराष्ट्र नाही. खेकडे खाऊन आरोग्य मंत्री सृदृढ असतील, अशी टीकाही तानाजी सावंत यांचं नाव न घेता केली.

..तर आंदोलनाची वेळ आली नसती
मला एका गोष्टीचा खेद वाटतो. तो हा की, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला काहीच करता आलं नाही, अशी कबुलीही ठाकरेंनी दिली. पण, त्या कोरोनाच्या काळात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सेवा देत होत्या. मात्र 8 महिने झाले तरी सरकार त्यांचे ऐकत नाही. आमचे सरकार पडले नसते तर तुम्हाला आंदोलनसाठी मुंबईत यावं लागलं नसतं, असंही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us