Anjali Damania On Nitin Gadkari: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania/strong>) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि अतुल शिरोडकर (Atul Shirodkar) यांच्यावर दोन दिवसांपूर्वी काही आरोप केले होते. गडकरी यांनी त्यांचा व्यावसायिक मित्र अतुल शिरोडकर यांना भांडुपमधील जमीन 89 लाख रुपयांना मिळवून दिल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्याविरोधात त्या न्यायालयात गेल्या होत्या. परंतु आता त्यांनाच एक धक्का बसला आहे. त्या न्यायालयीन लढाई हरल्या आहेत. स्वतः हा अंजली दमानिया यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दमानिया ट्वीट म्हणतात की, आज हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने Ad interim relief दिला नाही. म्हणजे आज ह्या सगळ्या लोकांची घरं, जी त्यांनी कष्टाच्या पैशांनी विकत घेतली होती , ती एक असा माणूस तोडणार जो फक्त गडकरींचा बिझनेस पार्टनर आहे, म्हणून जिंकला. वाह…खरच ह्या लढ्याला उपयोग आहे का???????? फक्त ढसा ढासा रडावंस वाटतंय. गडकरी तुमच्या कर्मांची फळे तुम्हाला ह्याच जन्मात भोगावी लागतील.
सावंत साहेबांना मध्ये घेतो का? तुला एवढी मस्ती…. निलेश घायवळची धमकी व्हायरल, ऑडिओ क्लिप चर्चेत
काय आहे प्रकरण ?
दोन दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केले होते. त्यात नितीन गडकरी आणि व्यावसायिक अतुल शिरोडकर यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यावर दमानिया म्हणतात की गडकरींच्या मागे उभा असलेला माणूस नीट पहा. हा माणूस म्हणजे अतुल शिरोडकर. हा गडकरींचा व्यावसायिक मित्र. सगळेच्या सगळे कायदे धाब्यावर बसवून, ACS वळसा नायर व ACS असीम गुप्ता ह्यांना गडकरींनी थेट फोन करून, मित्राला चार एकर भांडुपमधली जमीन, केवळ 89 लाखांत मिळवून दिली. ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण जे करतोय ते चुकीचे आहे, पण त्यांच्यात हिंमत नाही कायद्याने काम करायची. 89 लाखात भांडुपमधे आता 2BHKचे घर पण येत नाही. पण गडकरींच्या मित्राला एक हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळाला, असा दावा अंजली दमानिया यांचा होता.
(anjali-damania-on-nitin-gadkari-atul-shirodkar-bhandup-land-case Mumbai High Court)
आता SRA हा आता फक्त राजकारण्यांचा अड्डा ?
साईनगर भांडुप ही 660 घरांची वस्ती. अतिशय स्वच्छ चाळी. 1991-92 मध्ये ह्या 200 ते 250 फुटांची घरं एका जमीन मालकाने बांधली. घर व त्या खालची जमीन ही 660 कुटुंबाना विकली. तुम्ही सोसायटी झाली की मी conveyance करेन असे मालकाने सांगितले. सुखाने ही माणसे राहत होती.
2007 मधे ह्याच मालकाने हीच जमीन अतुल शिरोडकर याला 2 कोटी रुपयाला विकली. 2 कोटी पैकी फक्त 89 लाख त्या शिरोडकरने दिले. पण पैसे मिळतीलच असे समजून त्या मालकाने conveyance शिरोडकरच्या नावाने केले. 2009 मधे ह्या लोकांना कळले तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली. पण गडकरी ह्या शिरोडकरचे मित्र, त्यात आमदार सुनील राऊत मित्र मग काय विचारा
बंद घरे दाखवून खोटे कागदपत्रे केली ?
सर्व्हेला 660 पैकी तीनशे घरं बंद दाखवली. खोटी संमती दाखवली, खोटे कागदपत्र केले. Annexure I, Annexure II आणि Annexure III, तिन्ही बनावट. ना plan धड ना शिरोडकरांची आर्थिक स्थिती धड. सुनावणी घेणारे AGRC खरतर पाच लोकांचे असते. न्याय व्हावा म्हणून. आमच्या केसमध्ये पाच पैकी तीन जण नव्हते, असीम गुप्तांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, पण अश्विनी जोशी ह्यांनी डिस्सेंट ऑर्डर दिली. पण तरीही चार जणांचा निर्णय एकतर्फी आहे असे खोटे दाखवून, ३३/३८ ची नोटिस काढली, असा दावा दमानिया यांचा आहे.
ह्यांना न्याय मिळावा म्हणून, माझा स्वाभिमान बाजूला ठेऊन, ह्याच वर्षी एप्रिलमध्ये, मी दिल्लीला जाऊन गडकरींचे भेट घेतली , तेव्हा योगायोगाने संजय दिना पाटील पण भेटले. ते देखील माझ्या बरोबर आले. पण काहीही झालं नाही. मुंबईत मी सुनील राऊतांशी दोनदा बोलले, संजय राऊतांची सामनाच्या ऑफिसमधे जाऊन भेट घेतली. सगळ्यांकडे न्यायाची भीक मागितली. पण काही झाले नाही. शंभर वेळा फडणवीसांना विनंती केली. एकनाथ शिंदेंना भेटेल. तेही वळसा नायर ह्यांच्याशी बोलले. आशिष शेलार ह्यांना भेटलो. त्यांनी असीम गुप्ता यांना फोन केला. AGRC मधे स्वतः appear होऊन, जीव तोडून लढले. 11 सप्टेंबर ला गडकरी जिंकले, सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला. ही माणसे अतिक्रमण करून घुसखोरी करणारी नव्हती, ही घरं त्यांची स्वतःची होती. त्यांनी SRA च्या कडीपेट्यांच्या घरात का रहावं? असा सवाल दमानिया यांचा होता. तीन घरे पाडली जाणार होती. म्हणून अंजली दमानिया या हायकोर्टात गेल्या होत्या.