सावंत साहेबांना मध्ये घेतो का? तुला एवढी मस्ती…. निलेश घायवळची धमकी व्हायरल, ऑडिओ क्लिप चर्चेत
‘सावंत साहेबांना मध्ये का घेतो?’ अशी धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. याध्ये निलेश घायवळने धमकावल्याचा दावा.

Nilesh Ghaywal Alleged Audio Clip Viral : ‘सावंत साहेबांना मध्ये का घेतो?’ अशी धमकी देत असल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये निलेश घायवळ याने एका व्यक्तीला धमकावल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या क्लिपने मोठा गदारोळ उडवला असून, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडूनही घटनेंची सखोल चौकशी सुरू आहे.”
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
या क्लिपमध्ये दोन व्यक्तींचं संभाषण आहे. समोरील व्यक्ती निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) असल्याचं सांगितलं जातंय. जे फोनवर बोलताना म्हणत आहे, आवाज येतोय का? किती वेळात येतो तु, तु ये तुला काहीही मी करणार (Audio Clip) नाही. तुझ्यासोबत मला चार शब्द बोलायचं आहे. मी तुला सांगतोय, आज तु नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली सगळी दुकानदारी बंद. इकडं-तिकडं कोणाला सांगशील तर उद्या तुझी पुण्यातील सगळी दुकानदारी बंद म्हणजे (Pune Crime) बंद. शहाणा असशील तर इकडे ऑफिसला ये.
मस्ती कशाला तुला एवढी?
फोनवरील व्यक्ती म्हणते आपण दोघेही गरिबीतून मोठे झालो आहोत. यावर समोरील व्यक्ती म्हणत आहे, मी नाही आयघाल्या. माझा बाप सावकार होता पहिल्यापासून. तु लवकर ये. मस्ती कशाला तुला एवढी? फोनवरील व्यक्ती म्हणते, निलेश भाऊचे पोरं तुला उचलणार आहेत, असं मला सांगितलं आहे. यावर समोरील व्यक्ती म्हणते साहेबांचा अन् माझा काही संबंध नाही. मी तुला बोलवलं आहे, तु फक्त बंगल्यावर ये.
ए मादरचोद…
तु बंगल्यावर ये, मग सांगतो तुला काय चुकलं आहे. मी फक्त इतकंच सांगेन अर्जंट सेल मारायचा अन् पुण्यात निघून जायचं. पुण्यातच तुझा काय धंदा-पाणी आहे, तो सांभाळायचा. तु परत इकडे मला दिसायचं नाही. ए मादरचोद मी तुला काहीच बोललो नाही. मी फक्त तुला बंगल्यावर यायला सांगितलं आहे. घाबरायचं कशाला? मग मोठ्या माणसाच्या कुणाच्या नादाला लागायचं नाही, ना!
थांब तिथे मी आलो…
तु सावंत साहेबांचा विषय काढला. मी तुला बोललो नाही. मी तुला उद्यापासून सांगतो पुण्यात काय असतं? ते. सावंत साहेबांना कशाला तु मध्ये घेतलं. तो काय लहान माणूस आहे का? माझ्या जीवावर आमदार झाला आहे का? तु काय उपटणार आहे माझी? थांब तिथे मी आलो… अशी शिवीगाळ करत धमकावल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.