Download App

आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का? आशिष शेलारांची खरमरीत टीका

विधान परिषद निवडणुकीवरून आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच, कोस्टर रोडवरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.

Image Credit: Letsupp
Legislative Council Election 2024 : कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत आशिष शेलार यांनी ‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’ असा टोला लगावला आहे. आदित्य यांनी उंटावरून शेळ्या हाकू नयेत. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी कोस्टल रोडची कामे महापालिकेकडे घेतली. (Ashish Shelar) आदित्यच्या हट्टामुळे त्यांनी तसं केले असंही शेलार म्हणाले. ते दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या मुंबई भाजपा पदाधिकारी बैठकीबाबत माध्यमांशी बोलत होते.
महायुतीत महायुद्ध सुरू; कोकण पदवीधरचा तिढा कसा सुटणार?, मनसेकडून भाजपची कोंडी

कुणाचा दबाव होता का?
मी त्यावेळी प्रश्न मांडले, विधानसभेत बोललो. या कामात महापालिकेने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले होते का? त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आपल्याच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उप कंत्राटदार म्हणून कामे देण्यात आली होती. ती दुय्यम दर्जाची झाली. कामांना विलंब झाला. भ्रष्टाचार झाला. महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यांच्यावर दबाव होता का? असा थेट प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आम्हाला विजयाचा विश्वास
यावेळी आशिष शेलार  विधान परिषदेच्या पदवीध निवडणुकीवरही बोलले. तसंच, त्यांनी यावरूनही शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.
लोकसभेत पाठिंबा, कोकण पदवीधरमध्ये मनसे-भाजप आमने-सामने? अभिजित पानसेंना उमेदवारी
24 वर्षापासून जनसंघ भाजपकडे
शेलार म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांची पक्षाने केलेली नोंदणी मोठी आहे. नोंदणी रेकॉर्ड दाखल केलं आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय सुकाणू समितीमध्ये मित्र पक्षांशी बोलून घेऊ. मुंबईच्या जागेबाबत आता उबाठा सेनेचा काही प्रश्नच नाही. 24 वर्षे जनसंघ आणि भाजपकडे ही ही होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
follow us

वेब स्टोरीज