महायुतीत महायुद्ध सुरू; कोकण पदवीधरचा तिढा कसा सुटणार?, मनसेकडून भाजपची कोंडी

महायुतीत महायुद्ध सुरू; कोकण पदवीधरचा तिढा कसा सुटणार?, मनसेकडून भाजपची कोंडी

Vidhan Parishad Election 2024 :  लोकसभा निवडणुक 2019 ला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या विरोधात रान उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. अखेर, राज ठाकरेंनी राम मंदिर, 370 अशा कामांसाठी मोदींची स्तुती करत त्यांना आपला बिनशर्त पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राज ठाकरेंनी मोदींच्या उपस्थितीत प्रचार सभाही घेतली. (Abhijit Panse) दरम्यान, लोकसभेचा शेवटच्या टप्पा दोन दिवसांवर आला असतानाच मनसेकडून भाजपला धक्के द्यायला सुरूवात झाली आहे. महायुतीमध्ये एकत्र असणारे भाजपा-मनसे पदवीधर निवडणुकीत (Vidhan Parishad Election ) आमने-सामने आले आहेत.

 

राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर…; संजय राऊतांचा टोला

मार्ग कसा निघणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी भाजपाकडून निरंजन डावखरे रिंगणात आहेत. निरंजन डावखरे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार आहेत. आता यामध्ये कोण माघार घेतो की दोन्ही रिंगणात राहतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. मात्र, लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे सगळ्याच निवडणुकांमध्ये बिनशर्त महायुतीसोबत राहणार नसल्याचं आता समोर आलं आहे. तसंच, भाजपला मनसेने चांगलच अडकीत्यात पकडलं आहे. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांना पदवीधरसाठी दिलेला उमेदवार मागे घ्या कसा घ्यायला लावणार ही खरी भाजप नेत्यांची गोची झाली आहे.

 

मोठी बातमी! विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान

घट पक्ष नाही स्वतंत्र पक्ष

मनसे उमेदवार अभिजीत पानसे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी गेले अनेक महिने काम करत होतो. या निवडणुकीत नोंदणी प्रक्रिया असते. मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराने पदवीधरांसाठी काम केलं पाहिजे. मला कोणाचा इतिहास काढायचा नाही. कोकण पदवीधरांचा आमदार म्हणून काय केलं? मी गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे’. तसंच, गुढीपाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरे आपल्या भाषणात स्पष्ट म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला होता. येणारी प्रत्येक निवडणूक मनसे लढवणार आहे. आम्ही महायुतीचा घटक पक्ष नव्हतो. आमचा स्वतंत्र पक्ष आहे असंही पानसे म्हणाले आहेत.

 

मिठाटा खडा पडला

राज्यात राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलेली आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकची मदत मिळेल हे निश्चित असल्यामुळे यावेळीही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. मात्र, ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली आहे. तसंच, आता यामध्ये तोडगा काढताना मोठी दमछाग होणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज