Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर आता काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केलं.
Shankar Maharaj Samadhi: शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सतीश कोकाटे
मी कधीही सोनिया गांधींना भेटलो नाही. त्यामुळं मी सोनिया गांधींना भेटून माझी भावना व्यक्त केली, हे वक्तव्य दिशाभूल करणार असल्याचं चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधींनी मुंबईच्या सभेत जे विधान केलं त्यात त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही. जर ते माझ्याबाबती बोलत असतील तर तर्केहीन आहे. यामध्ये कोणतेही सत्य नाही. मी राजीनामा देईपर्यंत पक्षासाठी काम करत होतो. मी काँग्रेस सोडण्याबाबत कोणालाही माहीती नव्हती. मी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला तेव्हाच ही माहिती समोर आली, असे अशोक चव्हाण म्हणाले.
तोपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं की, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी सोनिया गांधींना भेटलो हे देखील खोटं आहे. मी जाऊन सोनिया गांधींना भेटणं, त्यांच्याजवळ भावना व्यक्त करणं यात काहीही तथ्य नाही. मी दिल्लीत सोनिया गांधींना भेटलो नाही, हे स्पष्ट करतो. राहुल गांधीचं कालचं विधान हे निवडणुकीच्या दृष्टीने केलं आहे. यात तथ्य नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा आईला म्हणाला, सोनियाजी, मला लाज वाटते, माझ्यात हिम्मत नाहीये या लोकांशी लढण्याची. या शक्तीशी लढाययचं नाही, मला तुरुंगात जायचं नाही. एक नाही, असे हजारो लोक घाबरले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच गेले. ते सर्व घाबरून भाजपसोबत गेले, अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली.