Shankar Maharaj Samadhi: शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सतीश कोकाटे

Shankar Maharaj Samadhi: शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सतीश कोकाटे

Pune News: धनकवडी (Dhankawadi) येथील श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी (Shankar Maharaj Samadhi) ट्रस्टच्या (Pune News) नुकत्याच झालेल्या विश्वस्त सभेत सतीश कोकाटे (Satish Kokate) यांची अध्यक्षपदी तर विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

सतीश कोकाटे हे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक म्हणून सुप्रसिद्ध असून मागील सत्तावीस वर्षांपासून ते भक्त म्हणून मठात येत आहेत. मठातील प्रसाद व अन्नदान प्रक्रियेत त्यांनी आमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या आहेत. याशिवाय श्री. कोकाटे हे दहा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सक्रिय सहभागी आहेत.

Sangharshayoddha: मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका

तर समाधी मठाच्या संकल्पित भक्तनिवास समितीच्या अध्यक्षपदी विश्वस्त डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या आदेशाप्रमाणे तळजाई रस्त्यावर ट्रस्टतर्फे भक्त निवासाकरीता जागा खरेदी पूर्ण झाली असून पुणे मनपा परवानगी नंतर
लवकरच तिथे बांधकाम सुरू होणार आहे.

विश्वस्त मंडळात डॅाक्टर पी. डी. पाटील राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले यांचा समावेश आहे. अशी माहीती ट्रस्टचे व्यवस्थापक सूर्यकांत केळकर यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube