मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूका जिंकूच शकत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ईव्हीएम (EVM) शिवाय निवडणूक जिंकूच शकत नाहीत. सरकार विरोधी पक्षांना ईव्हीएम दाखवायला तयार नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज भाजपवर केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. यानिमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा झाली. या सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
एक नेता पक्ष सोडताना माझ्या आईजवळ रडला; राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा दावा
या सभेला संबोधित करतांना राहुल गांधी म्हणाले, राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, तो भारतातील प्रत्येक संस्थेत आहे, ईडी, सीबीआय, आयकर विभागात आहे. मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाला हे ईव्हीएम मशीन विरोधी पक्षाला दाखवण्यास सांगितले. खोलून दाखवा, कसं चालंत हे दाखवा. आमच्या एक्सपर्टला दाखवा, असं सांगितलं. पण, त्यंनी दाखवलं नाही. मतं मशिनममध्ये नाहीत. मतं कागदात आहेत. तुम्ही मशिन चालवा, पण कागदाचीही मोजणी करा, पण ते म्हणतात, कागदाची मोजणी करणार नाही. सिस्टमला ही मोजणी नकोय, असं राहुल गांधी म्हणाले.
मोदींच्या कुटुंबात ते आणि फक्त त्यांची खुर्चीच, ‘मोदी का परिवार’वरून उद्धव ठाकरेंनी डिवचले
पुढं बोलतांना ते म्हणाल की, आम्ही भाजपविरोधात लढत आहोत. आम्ही सर्व एका राजकीय पक्षाविरुद्ध लढत आहोत, असे लोकांना वाटते. देशालाही तेच वाटते. पण ते सत्य नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध लढत नाही. देशातील तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे. काही लोकांना वाटते की आम्ही एका व्यक्तीशी लढतोय. आम्ही नरेंद्र मोदींविरोधात लढत नाही. आम्ही भाजपशीही लढत नाही. आम्ही एक शक्तीच्या विरोधात लढतोय, असं राहुल गांधी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हा फक्त एक चेहरा आहे. त्यांना चित्रपटातील हिरोसारखी एक भूमिका देण्यात आली आहे. ही 56 इंचाची छाती नसून खोकला आहे.
उद्योगपतींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, देशात 22 लोक आहेत ज्यांच्याकडे देशातील 170 कोटी जनते इतकी संपत्ती आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, लग्नासाठी 10 दिवसांत विमानतळ सुरू होते.
अनेक नेते ईडीच्या धाकाने भाजपसोबत
एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा आईला म्हणाला, सोनियाजी, मला लाज वाटते, माझ्यात हिम्मत नाहीये या लोकांशी लढण्याची. या शक्तीशी लढाययचं नाही, मला तुरुंगात जायचं नाही. एक नाही, असे हजारो लोक घाबरले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच गेले. ते सर्व घाबरून भाजपसोबत गेले, अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली.