Download App

पालघर जिल्ह्यात निवडणुकीचं मैदान टफ; बहुजन आघाडीची एन्ट्री, ‘इतक्या’ जागा लढणार

बहुजन विकास आघाडीकडून पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Maharashtra Politics : राज्याच्या विधासभा निवडणुकीची (Maharashtra Elections) घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चा होत आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला सुटणार? कुणाला तिकीट मिळणार? यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या याद्या लवकरच जाहीर होतील असेही सांगितले जात आहे. यातच आता एक महत्वाची बातमी पालघरमधून आली आहे. निवडणुकीत आणखी एक आघाडी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. बुधवारी (15 ऑक्टोबर) बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक विरार येथे पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील या सहा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कोकणात भाजपला धक्का! माजी आमदार हाती बांधणार शिवबंधन; नारायण राणेंवर गंभीर आरोप

या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सर्व सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व मतदारसंघांची चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व सहा जागा बहुजन विकास आघाडी स्वबळावर लढणार असल्याची माहिती माजी महापौर नारायण मानकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी राजेश पाटील, जेष्ठ नेते मुकेश सावे , माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी महापौर रुपेश जाधव, अजय खोकोणी, जितूभाई शहा, माजी सभापती प्रफुल साने, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते.

नारायण मानकर म्हणाले, पहिल्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेण्यात येऊन ठोस निर्णय घेतला गेला आहे. यानंतर पुढील टप्प्यात राज्यातील कोकण, सोलापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, मराठवाडा या भागांतील कोअर कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्तेशी चर्चा करून बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धाराशिव, रत्नागिरी अन् परभणी, आता पालघरची बारी; भाजपाचा प्लॅन शिंदेसेनेला डोईजड 

बहुजन विकास आघाडीचे नेते आणि कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यावर माजी उपमहापौर उमेश नाईक म्हणाले, अद्याप आमच्या पक्षापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे सध्या जर तरच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.

follow us