Balya Mama Suresh Mhatre Lok Sabha Election Result 2024 WIN : भाजपाने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. मात्र ते स्वप्न निकालाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत नाहीये. कारण भाजपाला वाटली होती तेवढी ही सोपी निवडणूक नाही. भाजपाला 300 ची संख्याही गाठणं कठीण जातं आहे. कारण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भाजपाला निवडणुकीत मोठा फटका बसला आहे हे समोर आलं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना महाराष्ट्रात झाला.यामध्ये काँटे की टक्कर झाली.
कल्याणमध्ये CM एकनाथ शिंदे यांचे (CM Eknath Shinde) चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मोठं मताधिक्य घेतलं आहे. तर दुसरीकडे भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले आहेत. (Balya Mama Suresh Mhatre)त्यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा 79 हजार 916 मतांनी पराभव केला आहे. सातवेळा पक्ष बदलणाऱ्या बाळ्यामामांना यावेळी शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती. शरद पवारांचा तो निर्णय योग्य ठरला आहे हेच दिसतं आहे. सुरेश म्हात्रेंनी 36 हजार मतांची आघाडी घेतली होती.
नितीन गडकरी यांची हॅटट्रीक, विकास ठाकरेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव
कपिल पाटील यांचं स्वप्न अपूर्ण?
भाजपाने 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेला कपिल पाटील यांना संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता भाजपाने त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं. मात्र बाळ्यामामांसाठी शरद पवारांनी केलेला प्रचार आणि लोकांनी केलेलं मतदान यामुळे कपिल पाटील यांची विजयाची हॅट् ट्रीक हुकले आहेत. भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे. मात्र महाविकास आघाडीत सुरेश उर्फ बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकिट देण्यात आले होते.