Download App

एक नेता पक्ष सोडताना माझ्या आईजवळ रडला; राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर झाली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला.


मोदींच्या कुटुंबात ते आणि फक्त त्यांची खुर्चीच, ‘मोदी का परिवार’वरून उद्धव ठाकरेंनी डिवचले

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसमधील एक वरिष्ठ नेता पक्ष सोडून गेला. त्या नेत्याचे नाव मी घेत नाही. पक्ष सोडतान तो आईशी बोलताना रडला. तो म्हणाला, मला लाज वाटत आहे की माझ्याकडे लढण्यासाठी शक्ती नाही. मला जेलमध्ये जायचे नाहीत. काँग्रेसचेचे नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी नेते असेच गेले का ? त्यासाठी ती शक्ती जबाबदार आहेत. हे लोक घाबरून भाजपमध्ये गेले असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं अनुपस्थित राहण्याचं कारण


राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त चेहरा आहेत, मुखवटा आहेत. बॉलिवूड अभिनेता प्रमाणे त्यांना स्क्रिप्ट दिली जाते. आज तुम्हाला हे करायचे आहे. तुम्ही हे करायचे आहे. सकाळी उठून समुद्रात जा. त्यांची 56 इंचाची छाती पोकळ माणूस आहे. तुम्ही कोणालाही घाबरत नाही तुम्ही, मोदींना हरवू शकता. देशातील बावीस लोकांकडे संपत्ती आहे. देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी वर्ष लागते. परंतु एकासाठी दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले जाते. ते ठीक आहे. बाकी देशातही विमानतळ सुरू करा. त्यांनी काय चूक केली आहे.


राहुल गांधीच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

– मीडियाच्या मालकांची यादी काढा, एक दलीत, एक आदिवासी दाखवा एकही मिळणार नाही
– 90 ऑफिसर या देशाला चालवतात. मी system आतून पहिली आहे. मला कळते म्हणून मोदीजी मला घाबरतात
– हे 90 लोक पॉलिसी बनवतात, त्यात 50-60 अब्जाधीश जोडा. ही खरी शक्ती देस चालवतात.
– Evm शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत.
– इलेक्शन कमिशन म्हणतं कागद मोजले जाणार नाहीत… का नाही होणार?
– – जितका GST तुम्ही देता तितकाच अदानी देतो.
– कधी म्हणतात चीन बघा, कधी म्हणतात पाकिस्तान बघा, कधी टॉर्च सुरू कर. कधी थाळी बजाव.
-आंबेडकर जी म्हणाले तसं कंपनीचे उत्पन्न नाही तितके electoral bonds घेतलेत.

follow us

वेब स्टोरीज