खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात ? शेलारांची ठाकरेंवर खरमरीत टीका

Ashish Shelar On Uddhav Thackeray : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आले आहे. हे काम देताना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. आज उद्धव ठाकरे () यांच्या नेतृत्वाखाली अदानींच्या बीकेसीतील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीकास्त्र सोडले. पन्नास खोके कमी […]

खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात ? शेलारांची ठाकरेंवर खरमरीत टीका

Ashish Shelar

Ashish Shelar On Uddhav Thackeray : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आले आहे. हे काम देताना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray/strong>) यांच्या नेतृत्वाखाली अदानींच्या बीकेसीतील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीकास्त्र सोडले. पन्नास खोके कमी पडायला. त्यामुळे धारावी गिळायला निघालेत, असा आरोप ठाकरेंनी केला आहे. त्याला आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘एक्स’वरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उध्दव ठाकरे (UT) म्हणजे यू टर्न… आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून प्रत्येक वेळी यू टर्न घेतलेत. आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे. “यू टर्न फेम” श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही “टि जंक्शन” वरूनच. म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच! असा टोलाच शेलारांनी लगावला आहे. एकदा “ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यू टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा! आज म्हणाले त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एक निर्णय दाखवा..बघा घेतला का यू टर्न? कोविडमध्ये बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला? असे शेलार यांनी म्हटले आहे. मुंबईकर हो! धारावीकरांचा यांना पुळका जोरात..खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात? असे शेलार यांनी म्हटले आहे.

अदानींनी ठाकरेंवरच डाव उलटवला, ‘धारावी प्रकल्पाच्या अटी मविआच्या काळातीलच….’

कायम म्हणालेत ठाकरे ?
या सरकारला पन्नास खोके कमी पडतात. हे असंविधानिक सरकार आहे. यांना वाटत आपल्याला कुणी जाब विचारू शकत नाही. प्रश्न अदानीला विचारला तर भाजप उत्तर देते. हे शासन तुमच्या दारी नाही, तर सरकार अदानीच्या दारी आहे. मात्र, दलालांनो, तुम्ही दलाली करून धारावी अदानीच्या घशात घालाल तर तुम्हाला चेचून-ठेचून काढू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मी जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत त्यांना मुंबई गिळंकृत करता येणार नाही, हे त्यांना कळले. म्हणूनच त्यांनी हे सरकार पाडले. अडीच वर्षे यशस्वीपणे चालवलेले सरकार गद्दारांनी पाडले. त्यांना खोके कुणी पुरवले? फ्लाइट आणि हॉटेल्स कोणी बुक केले? हे आज तुमच्या लक्षात आले असेल, असे म्हणत ठाकरेंनी अदानींवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version