‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् या वरळीत आमच्यासमोर’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज

Ashish Shelar On Aditya Thackeray : आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसातसा भाजप (BJP)आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा सामना नेहमी रंगत असतो. अशातच आता आदित्य ठाकरेंनी आगामी लोकसभेचे रणशिंग ठाण्यातून फुकले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका […]

'हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् या वरळीत आमच्यासमोर'; शेलारांचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज

Ashish Shelar

Ashish Shelar On Aditya Thackeray : आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसातसा भाजप (BJP)आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा सामना नेहमी रंगत असतो. अशातच आता आदित्य ठाकरेंनी आगामी लोकसभेचे रणशिंग ठाण्यातून फुकले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. वरळीतील प्रलंबित प्रश्नांवरून शेलारांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि या वरळीत आमच्यासमोर, असं आव्हान शेलारांनी केलं आहे.

Chandrashekhar Bavankule : जयंत पाटील संपर्कात नाही पण सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार; बावनकुळेंचं सुतोवाच

आदित्य ठाकरे काल ठाण्यात शिवसैनिकांशी संवाद साधतांना म्हणाले, शिवसेनेचे ठाणे, ठाण्यातील शिवसेना! हे नाते कोणीही कधीच पुसून टाकू शकणार नाही. आजही निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर ठाण्यात शिवसेनेचा बुरुज भक्कम उभा आहे, असं ठाकरे म्हणााले होते. त्यानंतर शेलारांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. वरळीतील जनता आजही शोध आहे, आमदार कुठे हरवलेत? वरळीतू निवडणून येणं शक्य नसल्यानं ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणं सुरू आहे, अशी टीका शेलारांनी केली.

Draupadi Murmu यांचा बालपण ते राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास! इराणींकडून राष्ट्रपतींची खास मुलाखत

आशिष शेलारांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करतात. त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प 20 वर्षांहून अधिक काळ रखडेत. तुमच्या काळात एक विटही रचली गेली नाही. कोरोनाच्या काळात वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे अतोनात हाल झाले ते दुनियेने पाहिले. कोस्टल रोडच्या खांबामुळं वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला ते टाहो फोडत होते, तेव्हा पालकमंत्री असतांना तर कोळी बांधवांना भेटालया सुध्दा तुमच्याकडे वेळ नव्हता, अशी टीका शेलारांनी केली.

शेलारांनी पुढं लिहिलं की, वरळीच्या बिडीडी चाळींतील व्यसायिक गाळे आणि रहिवाशांना पुनर्विकासातील घरे देणे तुम्हाला जमले नाही, त्यात जमेल तेवढा खोडाच घातलात. कोस्टल रोड तर तुमच्या काळात न्यायालयात अडकला. पोलीस वसाहतील पोलिसांना तुम्ही घरे देऊ शकला नाही. वरळीमधील जनता आजही शोध घेतेय की, आमदार कुठे हरवलेत? आता वरळीतून निवडून येणे शक्य नसल्याने ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणे सुरू आहे? गरंगोटीच्या नावाखाली वरळीतील चारदोन भिंतीना चुना लावून अशा प्रकारे वरळीतून पळ काढताय? मी तुम्हाला थेट आव्हान देतो…. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि या वरळीत आमच्यसमोर, असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

Exit mobile version