Download App

मोठी बातमी : अभिनेता गोविंदाला लागली गोळी; स्वतःच्याच रिव्हॉलरमधून गोळी सुटल्याने जखमी

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला आज सकाळी गोळी लागली. या घटने गोविंदा जखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला आज सकाळी गोळी (Govinda) लागली. या घटने गोविंदा जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यानंतर गोविंदला तातडीने CRITI केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोविंदा सकाळच्या वेळी बाहेर जाण्यासाठी निघाला असतानाच चुकून बंदुकीतून मिसफायर झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळी सुटल्यानंतर काही पोलीस (Mumbai Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी गोविंदाकडील बंदूक ताब्यात घेतली. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून मोठा रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे गोविंदाची प्रकृती जास्तच बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही  

गोविंदाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर गोविंदा सध्या अभिनयापासून दूर आहे. अनेक वर्षांपासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. त्याचे म्युझिक व्हिडिओ मात्र अधूनमधून येत असतात. याबरोबरच गोविंदा काही रियलिटी शोमध्ये दिसला आहे. टिव्हीवर गोविंदा बऱ्याचदा पत्नी सुनीताबरोबर दिसत असतो. मध्यंतरी त्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा राजकारणाची नवी इनिंग सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्याला निवडणुकीत तिकीट काही मिळालं नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या काळात मात्र त्याने शिंदे गटाच्या काही उमेदवारांचा प्रचार केला होता. निवडणुकीनंतर गोविंदा पुन्हा पडद्याआड झाला होता. आता पुन्हा गोविंदा चर्चेत आला आहे. गोविंदाच्या रिव्हॉल्वहरमधून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाला आहे. त्याच्यावर अंधेरीतीली क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यभर दही हंडी उत्सवाचा थरथरार! मुंबईत 129 गोविंदा जखमी; दोघं गंभीर, KEM रुग्णालयात उपचार

follow us