Download App

महाराष्ट्रात रचला जाणार इतिहास; मुंबईत होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार मुंबईत होणार आहे. वाडिया समूहाची बॉम्बे डाईंग कंपनी त्यांची वरळीमधील सुमारे 22 एकर जमीन विकणार आहे. जपानच्या सुमितोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीसोबत तब्बल 5, 200 कोटी रुपयांना हा व्यवहार ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बे डाईंग या डीलमधून मिळालेल्या पैशाचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि भविष्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करणार. (The Bombay Dyeing and Manufacturing Company Ltd (BDMC) announced to sell its Worli land parcel to a Japanese firm for Rs 5,200 crore)

बॉम्बे डाईंगने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीप्रमाणे, सुमितोमोची उपकंपनी गोईसू दोन टप्प्यांत या कराराचे पैसे देणार आहे. पहिल्या टप्प्यात 4, 675 कोटी रुपये देणार आहे. तर उर्वरित 525 कोटी रुपये काही अटींची पूर्तता केल्यानंतर दिले जातील. बॉम्बे डाईंगच्या संचालक मंडळाने करार मंजूर करण्यासाठी एक बैठक घेतली. हा करार अद्याप भागधारकांच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

मोठी बातमी : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं; सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती

शेअरच्या किमतीने 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला आहे

दरम्यान, या व्यवहाराचे वृत्त आल्यानंतर वाडिया समूहाची कंपनी बॉम्बे डाईंगच्या शेअर्सनी गुरुवारी 20 टक्क्यांनी उसळी घेतली आणि 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील शेअर्सच्या किंमीत 19.97 टक्क्यांनी वाढून 168.50 रुपयांवर पोहोचले. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील शेअर्स 20 टक्क्यांनी वाढून 168.60 रुपयांवर पोहचला. ही 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी ठरली.

बोगस पिक विमा धारकांना कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा दणका, पडताळणी करुनच पैसे देणार

1879 मध्ये सुरू झाली होती बॉम्बे डाईंग कंपनी

बॉम्बे डाईंग ही भारतातील एक अग्रगण्य कापड आणि घरगुती वस्तू बनवणारी कंपनी आहे. 1879 जहांगीर बजारिया आणि दोराबजी ताटंबरोवाला यांनी मुंबईत या कंपनीची स्थापन केली होती. बॉम्बे डाईंगने सुरुवातीच्या काळात बॉम्बे डाईंग, व्हाईट टेक्सटाइल्स आणि संगी सिल्क फॅब्रिक्स सारख्या अनेक उत्पादनांची निर्मिती केली. यानंतर वस्त्रोद्योगाव्यतिरिक्त या कंपनीने घरातील सामान, गृह फर्निचर, फर्निशिंग उत्पादने, टॉवेल, चादरी, बेडशीट, रेशीम धागे इत्यादींचे उत्पादन सुरू केले.पण वस्त्रोद्योगातील अडचणी, वाढत्या खर्चाचा सामना करणे, स्पर्धा, वाढते कर्ज, पर्यावरणीय समस्या अशा अनेक कारणांमुळे बॉम्बे डाईंग सध्या आर्थिक संकटातून जात आहे

Tags

follow us